AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याचा रोल किती बोलतो किती? म्हणणाऱ्यांना संतोष जुवेकरने दिलं उत्तर; सांगितलं अक्षय खन्नाशी न बोलण्यामागचं खरं कारण

अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा' या चित्रपटातील भूमिकेसंदर्भात दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली. या मुलाखतीत तो अक्षय खन्नाबद्दल बोलत होता. सेटवर अक्षयशी बोललोच नाही, असं वक्तव्य केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला तुफान ट्रोल केलं.

याचा रोल किती बोलतो किती? म्हणणाऱ्यांना संतोष जुवेकरने दिलं उत्तर; सांगितलं अक्षय खन्नाशी न बोलण्यामागचं खरं कारण
Akshay Khanna and Santosh JuvekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 10:28 AM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात रायाजींची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. चित्रपटाच्या सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं संतोष म्हणाला होता. त्यावर त्याला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर संतोषने आपली बाजू मांडली आहे. “अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये. लोक म्हणतील की आता सारवासारव करायला आला. पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात किंवा मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं”, असं जुवेकर म्हणाला.

याविषयी त्याने पुढे सांगितलं, “अक्षय खन्ना हा मुलाखती देत नाही, सोशल मीडियावर सक्रिय नाही, तो प्रमोशनलादेखील उपस्थित राहत नाही.. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मग मी पण हे सर्व करायचं नाही का? किंवा मी जे करतो तो त्यानं करायचं का? तो मोठा अभिनेता आहे, त्याला या सर्वांची गरज नाही. आम्ही स्ट्रगलर्स आहोत. आम्हाला या सर्वाची गरज आहे. लोक म्हणाले की याचा रोल किती हा बोलतो किती? अरे मी बोलणार. मी नुसता स्क्रीनवरून डोकावून गेलो तरी मी बोलणार. कारण या चित्रपटाचा एक भाग असणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अशा संधी प्रत्येकाला मिळत नाही. ज्यांना मिळालं त्यापैकी मी एक आहे.”

हे सुद्धा वाचा

“पुस्तक वाचल्यानंततर मला जो इतिहास कळला, त्यामुळे माझ्या मनात थोडासा राग आहेच. कोणाला राग येणार नाही? मला ट्रोल करणाऱ्यांपैकी एक जरी व्यक्ती तिथे असती तर त्यानेही तेच केलं असतं याची मला खात्री आहे. पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे, असा होत नाही. सेटवर आमच्या एका सहाय्यकाने मला विचारलं होतं की अक्षय खन्नाला भेटायचं आहे का? मी भेटायला गेलोसुद्धा होतो. पण त्याला औरंगजेबाच्या गेटअपमध्ये पाहून मी भेटण्यास नकार दिला. कारण मला ते बघवत नव्हतं”, असं संतोष जुवेकरने स्पष्ट केलं.

संतोष जुवेकर काय म्हणाला होता?

‘छावा’ या चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव सांगताना संतोष जुवेकर एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत, त्या कोणाशीच मी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. त्यांच्या बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण मी त्याच्याकडे बघितलंच नाही. माझा त्याच्यावर काही वैयक्तिक राग नाही. पण मला त्याच्याशी बोलावंसं वाटलं नाही.”

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.