विराट कोहलीसोबत खेळणाऱ्या क्रिकेटरने अभिनेत्याला सर्वांसमोर किस केलं तेव्हा…, कोण आहे ‘तो’?
एकेकाळी 'हा' क्रिकेटर विराट कोहलीसोबत असायचा मैदानात, पण अभिनेत्याला सर्वांसमोर किस केल्यामुळे आला चर्चेत, आता करतो तरी काय, कोण आहे 'तो'? क्रिकेट विश्वात सक्रिय नसला तरी कमावतो कोट्यवधींची माया

बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वाच फार जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटर असे देखील आहेत, ज्यांनी क्रिकेटचा निरोप घेत बॉलिवूडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. अशाच एक अभिनेता आहे, ज्याने क्रिकेट सोडलं आणि अभिनय विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता साकिब सलीम आहे. एक वेळ अशी होती जेव्हा साकिब क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत मैदानात असायचा. पण आता साकिब मॉडेलिंग आणि अभिनय विश्वात सक्रिय आहे. साकिब याने ‘मेरे डॅड की मारुती’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘रेस 3′, ’83’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली. पण ‘बॉम्बे टॉकीज’ सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे साकिब तुफान चर्चेत आला.
एका मुलाखतीत साकिब याने रणदीप याच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनवर मौन सोडलं होतं. ‘माझ्यासाठी तो क्षण फार महत्त्वाचा होता. कारण तेव्हा मी प्रचंड विचलित झालेलो. रणदीप आणि माझा किसिंग सीन होता. मला आज देखील आठवत आहे की, किती लोकं तेव्हा सेटवर होती. पण आम्ही एका टेकमध्ये सीन पूर्ण केला.’




‘दिग्दर्शकांनी सांगितलं सीन ओके आहे आता दुसरा सीन करुया… मी आणि रणदीप एकमेकांकडे पाहायला लागलो त्यानंतर आम्ही विचारलं देखील खरंच सीन योग्य वाटत आहे का? आम्हाला सीनवर विश्वास नव्हता. पण दिग्दर्शकाची मान्यता होती.’
View this post on Instagram
पुढे अभिनेता म्हणाला, ‘त्या दिवसांमध्ये 2 अभिनेत्यांनी होमोसेक्शुअल भूमिका साकारणं फार जिकरीचं होतं. सीन आम्ही गच्चीत शूट केला होता. सर्व शांत बसले होते. काहीच कळत नव्हत काय बोलावं. पण सीन एका टेकमध्ये पूर्ण झाला आणि दुसऱ्या सीनला आम्ही सुरुवात केली…’, असं देखील साकिब म्हणाला.
साकिब सलीम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो अभिनेत्री हुबा कुरेशी हिचा भाऊ आहे. दिल्लीतील प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनचे मालक सलीम कुरेशी यांचा मुलगा साकिबने सुरुवातीला क्रिकेटमध्ये आणि नंतर वडिलांच्या व्यवसायात हात आजमावला. पण त्यानंतर साकिबने अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली.