‘ॲनिमल’ मधील इंटिमेट सीनसाठी सारा अली खान हिने दिलं होतं ऑडिशन? सत्य अखेर समोर

Animal | ‘ॲनिमल’ सिनेमात तृप्ती डिमरी हिच्या जागी झळकली असती सारा अली खान, अभिनेत्रीने इंटिमेट सीनसाठी दिलं होतं ऑडिशन? सत्य अखेर समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा...

‘ॲनिमल’ मधील इंटिमेट सीनसाठी सारा अली खान हिने दिलं होतं ऑडिशन? सत्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 3:01 PM

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील करताना दिसत आहे. ‘ॲनिमल’ सिनेमातील इंटिमेट सीन आणि वादग्रस्त डायलॉग तुफान चर्चेत आहेत. सिनेमातील रणबीर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्यातील इंटिमेट सीन सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. काही रिपोर्टनुसार, ‘ॲनिमल’ सिनेमातील इंटिमेट सीनसाठी अभिनेत्री सारा अली खान हिने ऑडिशन दिल्याची माहिती समोर आली होती. पण आता रंगणाऱ्या चर्चांचं मोठं सत्य समोर आलं आहे. सध्या सर्वत्र सारा अली खान आणि ‘ॲनिमल’ सिनेमातील इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे.

सारा अली खान हिने ‘ॲनिमल’ सिनेमातील इंटिमेट सीनसाठी ऑडिशन दिलं आणि अभिनेत्रीला नकार देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. अता यामागचं सत्य समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना सारा हिचा अभिनय आवडला नाही, म्हणून त्यांनी सिनेमातील झोया या भूमिकेसाठी तृप्ती हिची निवड झाली…

हे सुद्धा वाचा

नक्की काय आहे सत्य?

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खान हिने सिनेमासाठी ऑडिशन दिलं नव्हतं. याचा अर्थ ‘ॲनिमल’ सिनेमा आणि सारा अली खान दोघांमध्ये काहीही कनेक्शन नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.

सांगायचं झालं तर, सिनेमात तृप्ती हिची फार छोटी भूमिका आहे. पण सर्वत्र फक्त तृप्ती आणि रणबीर यांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. शिवाय, सोशल मीडियावर देखील तृप्ती हिच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सध्या तुफान चर्चेत आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मु्ख्य भूमिका साकारली आहे. सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ हा मल्टीस्टारर सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. सिनेमाने आतापर्यंत तब्बल जवळपास 400 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.