Married Life: ‘त्या 12 वर्षांच्या बदल्यात…’, घटस्फोटावर सैफ अली खानच्या पहिल्या बायकोचं मोठं वक्तव्य
Married Life: घटस्फोटानंतर सैफ अली खान याच्या पहिल्या पत्नीने सहन केल्या अनेक गोष्टी.., मुलाखतीत अमृता सिंग हिचं मोठं वक्तव्य, सैफ अली खान - अमृता सिंग यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत, तरी देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात.
अभिनेता सैफ अली खान याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री अमृता सिंग आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अमृता सिंग – सैफ अली खान यांच्या नात्याचा अंत फार वर्षांपूर्वी झाला होता. घटस्फोटानंतर अमृता हिच्या आयुष्यात अनेक बदल झाले. अमृता हिने घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. घटस्फोटानंतर अमृता हिच्या खांद्यावर दोन मुलांची जबाबदारी होती. ज्यामुळे अमृता हिला पैशांची गरज होती.
मुलाखतीत अमृता सिंग म्हणाली होती, ‘माझ्या आयुष्यात जे काही झालं त्यानंतर मला नोकरीची गरज होती. मला असं काही हवं होतं, ज्यामुळे मी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खंबीर असेल. मान्य करते की मी आळशी आहे. मला काहीच करायला आवडत नाही, पण परिस्थिती अशी होती काहीच न करून देखील चालणार नव्हतं. मला याची खंत नाही की 12 वर्ष काम केलं नाही..’
View this post on Instagram
‘जे 12 वर्ष मी काम केलं नाही, त्या बदल्यात मला फार काही मिळालं. घटस्फोटानंतर मला खूप वाईट वाटलं होतं. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार मी करत नव्हती. पण एक महिला असल्यामुळे तो काळ माझ्यासाठी भावनीक होता. अखेर मी परिस्थिती स्वीकारली. त्यानंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात सोप्या झाल्या… घटस्फोटानंतर मुलांचा सांभाळ, पैशांसाठी नोकरी करणं सिंगल मदर म्हणून या गोष्टींची मला कधीच भीती वाटली नाही…’
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘समोर आलेल्या परिस्थितीला मी कधीच घाबरली नाही. कारण मला माहिती होतं की सर्वकाही करू शकते. कोणतीच गोष्ट मला घाबरवू शकत नाही. जास्तीतजास्त काय झालं असतं, मला पैशांची बचत करावी लागली असते. पैसे विचार करुन खर्च करावे लागले असते. पण छोट्या घरात पोट भरण्यासाठी अन्न मिळालंच असतं.’ असं देखील अमृता मुलाखतीत म्हणाली होती.
सैफ अली खान – अमृता सिंग
सैफ याने फार कमी वयात अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं. दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं देखील आहेत. अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं.