Sara Ali Khan | “माझ्याकडून काही अशा चुका झाल्या आहेत..”; अखेर सारा अली खानने मान्य केली ‘ती’ गोष्ट

'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या चुकांची कबुली दिली. या मुलाखतीत सारा तिच्या करिअरविषयी आणि केलेल्या चुकांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Sara Ali Khan | माझ्याकडून काही अशा चुका झाल्या आहेत..; अखेर सारा अली खानने मान्य केली 'ती' गोष्ट
Sara Ali Khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 2:57 PM

मुंबई : बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत राहणारी स्टारकिड म्हणजे अभिनेत्री सारा अली खान. 2018 मध्ये तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारा तिच्या करिअरविषयी आणि या प्रवासात केलेल्या चुकांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. साराच्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. अशा चित्रपटांवरही तिने प्रतिक्रिया दिली. चुका करण्याचं माझं वयच आहे, असं म्हणत असतानात त्यातून शिकायला मिळत असल्याचंही साराने मान्य केलं.

“एक अभिनेत्री म्हणून मला दररोज भरपूर काही शिकायला मिळतं आणि हाच प्रवास माझ्या प्रगतीसाठी उपयोगी आहे. मी नेहमीच अशा गोष्टींमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. पण मीसुद्धा काही चुका केल्या आहेत, हे मान्य करते. मी असे काही चित्रपट केले आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण तरी, चुका करण्याचं हे माझं वय आहे. पुन्हा जोमाने उभं राहण्यासाठी खाली पडणंही तितकंच महत्त्वाचं असतं”, असं सारा या मुलाखतीत म्हणाली. चुकांविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “चुका करणे हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे, हे मी शिकले आहे.”

हे सुद्धा वाचा

2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यामध्ये तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात झळकली. साराच्या करिअरमधील हे पहिले दोन चित्रपट यशस्वी ठरले. मात्र इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ आणि ‘कुली नंबर 1’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सध्या साराच्या हाती बरेच प्रोजेक्ट्स आहेत. लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय विक्रांत मेस्सीसोबत ‘गॅसलाईट’ चित्रपटात ती झळकणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित ‘मर्डर मुबारक’, ‘ऐ वतन मेरे वतन’ आणि अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो… इन दिनों’ या चित्रपटांची ऑफर तिच्याकडे आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.