‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्करने चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. तिच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये बेबी बंप दिसून येत होतं. मात्र दीपिका आणि शोएबने त्यावर मौन बाळगलं होतं. अखेर आता सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली.

'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्करने चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
Dipika Kakar and Sohaib IbrahimImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 2:44 PM

मुंबई: ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. अखेर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘गुड न्यूज’ दिली आहे. दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघं सोबत बसले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर कॅप आहे. या कॅपवर ‘मॉम’ आणि ‘डॅड’ असं लिहिलं आहे.

शोएबने फोटो शेअर करत लिहिलं, ‘तुम्हा सर्वांसोबत ही गोड बातमी शेअर करताना माझ्या मनात आनंद, कृतज्ञता, उत्साह आणि थोडी नर्व्हसनेससुद्धा आहे. आमच्या आयुष्यातील हा सर्वांत सुंदर क्षण आहे. आम्ही दोघं लवकरच आई-बाबा होणार आहोत. आमच्या बाळाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची खूप गरज आहे.’

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. तिच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये बेबी बंप दिसून येत होतं. मात्र दीपिका आणि शोएबने त्यावर मौन बाळगलं होतं. अखेर आता सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली. या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिका प्रकाशझोतात आली होती. सलमान खानच्या बिग बॉस 12 ची ती विजेतीदेखील ठरली आहे. दीपिकाने 2018 मध्ये टीव्ही अभिनेता शोएबसोबत लग्न केलं. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका शोएबच्या प्रेमात पडली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.