Satish Kaushik | “मला वाचवा..”; निधनापूर्वी काय म्हणाले होते सतीश कौशिक? मॅनेजरने केला खुलासा

सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती.

Satish Kaushik | मला वाचवा..; निधनापूर्वी काय म्हणाले होते सतीश कौशिक? मॅनेजरने केला खुलासा
Satish KaushikImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 8:22 AM

मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कौशिक यांच्या मॅनेजरने त्यांच्यासोबतच्या अखेरच्या क्षणांच्या आठवणी सांगितल्या. अखेरच्या क्षणी कौशिक काय म्हणाले, हे मॅनेजर संतोश रायने सांगितलं. सतीश कौशिक बुधवारी मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं.

सतीश कौशिक यांची तब्येत अचानक कशी बिघडली आणि अखेरच्या क्षणी त्यांची काय इच्छा होती, याबाबतचा खुलासा संतोष राय यांनी या मुलाखतीत केला. कारमध्ये नेमकं काय झालं होतं, असा सवाल मॅनेजरला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “आम्ही प्रवास सुरू केल्यानंतर थोड्याच वेळाने त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं. गाडी रुग्णालयाकडे वळवण्यास त्यांनी मला सांगितलं होतं.”

हे सुद्धा वाचा

मॅनेजरने सांगितलं की कौशिक यांनी त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाले, “संतोष मला मरायचं नाही, मला वाचव. होळीचा दिवस होता आणि त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हतं. आम्ही आठ ते दहा मिनिटांत रुग्णालयात पोहोचलो होतो. मात्र तोपर्यंत सतीश कौशिक बेशुद्ध झाले होते. त्यापूर्वी ते माझ्याशी थोडं बोलत होते. मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे, असं ते म्हणत होते. शशी आणि वंशिकाची काळजी घे, असंही ते म्हणाले.”

सतीश कौशिक यांनी शशी कौशिक यांच्याशी लग्न केलं होतं आणि या दोघांना एक मुलगा होता. मात्र वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांच्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून हे दोघं पुन्हा पालक झाले. कौशिक यांची मुलगी वंशिका आता 10 वर्षांची आहे. सोशल मीडियावर ते अनेकदा मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायचे.

मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.