वंशिकासाठी Satish Kaushik यांना जगायचं होतं, लेकीसाठी अभिनेत्याचे ‘फ्यूचर प्लॅन’ म्हणजे…

वयाच्या १० व्या वर्षी लेकीला सोडून गेले सतीश कौशिक, वडिलांच्या निधनानंतर कशी होती मुलीची अवस्था, वंशिकासाठी 'हे' होते कौशिक यांचे 'फ्यूचर प्लॅन', मुलीसाठी त्यांना जगाचं होतं पण...

वंशिकासाठी Satish Kaushik यांना जगायचं होतं, लेकीसाठी अभिनेत्याचे 'फ्यूचर प्लॅन' म्हणजे...
सतीश कौशिक आणि त्यांचे कुटुंबीय
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 9:58 AM

Satish Kaushik Daughter : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या आयुष्यात मोठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतीश कौशिक यांनी ज्याप्रकारे चाहत्यांच्या मनात घर केलं, त्याचप्रमाणे कौशिक त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील खास होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्राद्धांजली वाहिली. तर अनेक सेलिब्रिटी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. सतीश कौशिक, पत्नी आणि लेक वंशिका कौशिक हिला सोडून गेले आहेत. सतीश कौशिक यांनी मुलीसाठी अनेक स्वप्ने पाहिली होती. पण मुलीबद्दल त्यांची स्वप्न अपूर्ण राहिले आहेत. (Satish Kaushik Daughter)

सतीश कौशिक याचे मित्र आणि निर्माते रुमी जाफरी (Rumi Jaffery) यांनी अभिनेत्याच्या निधनावर दुःख व्यक्त करत जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. एका मुलाखतीत रुमी म्हणाले, ‘सतीश यांच्या निधनाची बातमी कळताच मी आणि पत्नी त्यांच्या घरी पोहोचलो. माझी पत्नी आणि सतीश यांच्या मुलीचं फार घट्ट नातं आहे. आम्ही तेथे पोहोचल्यानंतर वंशिका माझ्या पत्नीच्या मांडीवरच गप्प बसली होती.’

‘सतीश यांच्या निधनावर आम्हाला विश्वासच बसत नव्हता. सतीश यांनी त्यांच्या फ्यूचर प्लॅनबद्दल देखील आम्हाला सांगितलं. त्यांच्याकडे करण्यासारखं खूप काही होतं. आम्ही दोघांनी अनुपम खेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र डिनर देखील केलं होतं. ते खूप व्यस्त होते. सतीश आणि मी गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्तकाळ चांगले मित्र म्हणून एकत्र होतो.’

हे सुद्धा वाचा

‘मुलीसाठी त्यांनी अनेक स्वप्न पाहिली होती. सतीश यांना मुलीला आयुष्यात सेटल झालेलं पाहायचं होतं. लेकीसाठी त्यांना जिवंत राहचं होतं. मुलीसाठी त्यांचे अनेक फ्यूचर प्लॅन होते. पण देवाची वेगळीच प्लॅनिंग होती.’ असं देखील रुमी जाफरी खास मित्र सतीश कौशिक यांच्याबद्दल म्हणाले..सतिश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका कौशिक यांना सोडून गेले आहेत. पण कुटुंबासाठी सतीश कौशिक यांनी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इकती आहे. अभिनयातून सतीश कौशिक यांनी कोट्यवधींचं संपत्ती कमावली आहे.

अभिनेते, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते… या सर्वच क्षेत्रात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सतीश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण सतीश कौशिक यांना सुरुवातीला अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. पण आज सतीश कौशिक आपल्यात नसले तरी अनेकांच्या प्रेरणास्थानी तर नक्की राहतील.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.