Satish Kaushik | सतीश कौशिक यांना बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर होता जबरदस्त क्रश, स्वत:च केला खुलासा

दिल्ली एनसीआरमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली आणि दु:ख व्यक्त केलं.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांना  बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर होता जबरदस्त क्रश, स्वत:च केला खुलासा
Satish Kaushik Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 10:54 AM

मुंबई : कॅमेरासमोर आणि कॅमेरामागेही दमदार काम करत आपली वेगळी छाप सोडणारे अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (गुरुवारी) निधन झालं. प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘जाने भी दो यारो’, ‘वो 7 दिन’, ‘मासूम’, ‘मंडी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘साजन चले ससुराल’, ‘राम लखन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘आंटी नंबर 1’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. तर ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. सतीश कौशिक हे त्यांच्या हसत्या-खेळत्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या क्रशचा खुलासा केला होता.

2021 मध्ये ‘कागज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सतीश कौशिक हे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरसुद्धा त्यांच्यासोबत होते. शोमध्ये पोहोचताच सतीश यांनी त्यांच्या क्रशविषयी सांगितलं. कपिल शर्मा शोमध्ये दिसणाऱ्या एका अभिनेत्रीवर माझं प्रेम होतं, असं ते म्हणाले. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अर्चना पुरण सिंग आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

कपिलच्या शोमध्ये त्यांनी सांगितलं की एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते अर्चनावर प्रेम करू लागले. या क्रशची सुरुवात मैत्रीने झाली होती. याविषयीचा किस्सासुद्धा त्यांनी सांगितला. “दुबईतील एका शूटिंगदरम्यान अर्चना सेटवर खूप घाबरत आली होती. काही लोकांनी तिची छेड काढली आणि तिचा पाठलाग केला, असं तिने सांगितलं. अर्चनावर आपली छाप सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, असं समजून मी आयोजकांना सांगितलं की त्या गुंडांना आधी इथे घेऊन या. तोपर्यंत शो करणार नाही असा इशाराच दिला होता. अर्चनासाठी मी शूटिंग थांबवली होती”, असं ते म्हणाले.

“कपिल ही माझी चौतिसावी क्रश आहे. जर परमीत हिच्या आयुष्यात आला नसला तर हा क्रश (स्वत:) तिच्यावर क्रशर झाला असता”, असं ते पुढे मस्करीत म्हणाले. त्यावेळी अर्चनानेही सतीश यांचं कौतुक केलं. सतीश हे जगातील सर्वोत्कृष्ट मित्र असल्याचं तिने म्हटलं होतं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.