Satish Kaushik Wife : ‘फायद्यासाठी माझ्या पतीचा वापर…’, ‘या’ महिलेवर सतीश कौशिक यांच्या पत्नीचा संताप

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर धक्कादायक माहिती समोर येत असताना 'या' महिलेवर भडकल्या कौशिक यांच्या पत्नी, शशी कौशिक म्हणाल्या..., अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ

Satish Kaushik Wife : 'फायद्यासाठी माझ्या पतीचा वापर...', 'या' महिलेवर सतीश कौशिक यांच्या पत्नीचा संताप
सतीश कौशिक आणि त्यांचे कुटुंबीय
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 3:08 PM

Satish Kaushik Wife : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सतीश याचं निधन नाही तर हत्या झाल्याचा दावा सन्वी मालू यांनी केला आहे. सान्वी मालू अभिनेते सतीश कौशिक यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नी आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी सान्वी यांनी पती विकास मालू यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आता याप्रकरणी सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी संताप व्यक्त केलं आहे. शिवाय सान्वी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या पतीच्या नावाचा वापर करणं बंद करावं.. असं देखील शशी कौशिक म्हणाल्या आहेत.

सतीश कौशिक आणि विकास मालू यांच्या मैत्रीबद्दल शशी म्हणाल्या, ‘विकास आणि सतीश चांगले मित्र होते. विकास प्रचंड श्रीमंत आहेत, त्यांना कधीही सतीश यांच्याकडून पैसे घेण्याची गरज भासली नाही. सतीश यांना ९८ टक्के ब्लॉकेज असल्याचं त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे…’ असं देखील शशी म्हणाल्या.

सान्वी यांच्याबद्दल शशी कौशिक म्हणाल्या, ‘पोलिसांनी पडताळणी केली आहे. सान्वी खोटे दावे का करत आहे, सतीश यांना ड्रग्स देण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. माझ्या पतीच्या निधनानंतर सान्वी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करणं बंद करावं. त्यांना नक्की काय साध्य करायचं आहे, मला माहिती नाही. कदाचित सान्वी यांना त्यांच्या पतीकडून पैसे हवे असतील आणि त्यासाठी माझ्य पतीच्या नावाचा वापर करत आहे. ‘

हे सुद्धा वाचा

शशी पुढे म्हणाल्या, ‘मी सान्वी यांना विनंती करते असं काही करु नका… याप्रकरणी मला कोणताही संशय नाही. त्यामुळे आता याप्रकरणी कोणतीही तपासणी नको. कोणताही मोठा व्यवहार करण्याआधी सतीश मला विचारायचे. त्यांच्या निधनानंतर जे काही होत आहे, ते पाहून मला वाईट वाटत आहे.’ सध्या सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पत्नी शशी कौशिक यांनी केलेलं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.

विकास यांनी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा सान्वी मालू यांनी केला. एवढंच नाही तर, सतीश सतत पैसे मागत असल्यामुळे विकास यांनी सतीश यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप सान्वी यांनी पतीवर केला. शिवाय हत्या करण्यासाठी ब्ल्यू पील्स आणि रशियन मुलीचा वापर केल्याचा आरोप देखील सान्वी यांनी पती विकास यांच्यावर केला आहे. सान्वी यांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर सतीश कौशिक याच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.