Box Office | ‘सत्यप्रेम की कथा’ येताच ‘आदिपुरुष’च्या कमाईत मोठी घसरण; कार्तिक-कियाराची जोडी पुन्हा ठरणार हिट?

'भुलभुलैय्या 2'ने प्रदर्शनाच्या दिवशी 14.11 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर कार्तिकच्या 'शहजादा' या चित्रपटापेक्षा 'सत्यप्रेम की कथा'ने चांगली कमाई केली आहे. 'शहजादा'ने पहिल्या दिवशी 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Box Office | 'सत्यप्रेम की कथा' येताच 'आदिपुरुष'च्या कमाईत मोठी घसरण; कार्तिक-कियाराची जोडी पुन्हा ठरणार हिट?
Satyaprem Ki KathaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 10:17 AM

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट ‘बकरी ईद’ आणि ‘आषाढी एकादशी’च्या मुहूर्तावर गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच ‘आदिपुरुष’ आणि ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील खेळ जवळपास खल्लास झाला आहे. तगड्या बजेटचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फक्त सुरुवातीच्या दिवसांत गाजला. मात्र प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांनंतर त्याची कमाई ढासळू लागली. आता नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसला आहे.

‘आदिपुरुष’ची कमाई

दुसरीकडे विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला आहे. मात्र या चित्रपटाने ‘आदिपुरुष’पेक्षाही दमदार कामगिरी केली आहे. सध्या ‘आदिपुरुष’ला प्रदर्शित होऊन 14 दिवस आणि ‘जरा हटके जरा बचके’ला प्रदर्शित होऊन 28 दिवस झाले आहेत. चौदाव्या दिवशी ‘आदिपुरुष’ने फक्त 90 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. याचसोबत चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 281.98 कोटी रुपये इतकी झाली.

सारा-विकीची कमाल

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात पहिल्यांदाच सारा आणि विकीने एकत्र काम केलं. या नव्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रदर्शनाच्या 28 व्या दिवशी या चित्रपटाने 50 लाख रुपये कमावले आहेत. तर या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 82.31 कोटी रुपये झाली आहे.

हे सुद्धा वाचा

कार्तिक आणि कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपये कमावले आहेत. कार्तिक आणि कियाराच्या ‘भुलभुलैय्या 2’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा हा आकडा थोडा कमी आहे. ‘भुलभुलैय्या 2’ने प्रदर्शनाच्या दिवशी 14.11 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर कार्तिकच्या ‘शहजादा’ या चित्रपटापेक्षा ‘सत्यप्रेम की कथा’ने चांगली कमाई केली आहे. ‘शहजादा’ने पहिल्या दिवशी 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.