Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बी, अभिषेक, ऐश्वर्या, शाहरुखचा एकत्र डान्स; अंबानींच्या शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, करीना कपूर, करण जोहर अशी सेलिब्रिटींची मांदियाळीच या कार्यक्रमात पहायला मिळाली.

बिग बी, अभिषेक, ऐश्वर्या, शाहरुखचा एकत्र डान्स; अंबानींच्या शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर
annual day eventImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 11:47 AM

मुंबई : 16 डिसेंबर 2023 | शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी धिरुभाई अंबानी स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेतात. त्यामुळे या वार्षिक कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यापासून ते करीना कपूर, शाहिद कपूर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. आता याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, करण जोहर, शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान हे एकत्र डान्स करताना दिसत आहेत. शाहरुखच्याच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दिवानगी दिवानगी’ या गाण्यावर सर्वजण एकत्र नाचताना दिसत आहेत.

शाहरुखचा मुलगा अबराम, ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या यांनी या वार्षिक कार्यक्रमात नाटक सादर केलं होतं. या दोघांचं अभिनय पाहून नेटकरीसुद्धा भारावले. मुलांच्या सर्व परफॉर्मन्सनंतर त्यांच्या पालकांसाठी ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दिवानगी दिवानगी’ हे गाणं वाजवण्यात आलं होतं. यावेळी सर्व पालकांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनीही डान्स केला. ऐश्वर्या, अभिषेक, करण जोहर, शाहरुख खान हे सर्वजण एकत्र थिरकताना दिसले.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

अंबानींच्या शाळेतील या वार्षिक कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. या कार्यक्रमातील मुलांच्या परफॉर्मन्सचेही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. आराध्या बच्चनने अत्यंत उत्तम अभिनय करत नेटकऱ्यांची मनं जिंकली. तर दुसरीकडे शाहरुखच्या 10 वर्षांच्या अबरामनेही स्टेजवर दमदार परफॉर्म केला. इतकंच नव्हे तर त्याने शाहरुखची आयकॉनिक पोझसुद्धा करून दाखवली. हे पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख, गौरी आणि सुहानाला हसू अनावर झालं होतं.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरसुद्धा कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात आपल्या मुलाचा अत्यंत कौतुकाने व्हिडीओ काढताना करीना दिसली. याशिवाय शाहिद कपूर आणि मीरा यांची मुलं, करण जोहरची दोन्ही मुलं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व स्टारकिड्सना वेगवेगळ्या वेशभूषेत पहायला मिळालं.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.