Box office | शाहरुख खान हाच ठरला बॉक्स ऑफिसवर किंग, ‘गदर 2’चा एक दिवसाचा जलवा संपला

शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट आणि सनी देओल याचा गदर 2 चित्रपट धमाका करताना दिसला. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

Box office | शाहरुख खान हाच ठरला बॉक्स ऑफिसवर किंग, 'गदर 2'चा एक दिवसाचा जलवा संपला
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 10:18 PM

मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट (Movie) मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. शाहरुख खान याचा 2018 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. झिरो हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान याला मोठा झटका बसला. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा झिरो चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. शाहरुख खान याचा झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शाहरुख खान याच्या रिलीज झालेल्या पठाण चित्रपटाने मोठा धमाका केला. शाहरुख खान याच्या या पठाण चित्रपटाने हिंदूमधून 540 कोटींचे कलेक्शन करत मोठा रेकाॅर्ड ब्रेक केला. इतकेच नाही तर पठाण चित्रपटाने बाहुबली चित्रपटाला कमाईमध्ये मागे टाकले.

सनी देओल याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटाने तूफान अशी कमाई करत थेट पठाण चित्रपटाचे काही रेकाॅर्ड तोडले. इतकेच नाही तर सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाने सातव्या दिवशीही धमाका केला. सनी देओल याने बऱ्याच वर्षांनंतर धमाकेदार पद्धतीने पुनरागमन हे नक्कीच केले.

बुधवारी 48 व्या दिवशी गदर 2 चित्रपटाने पठाण चित्रपटाला मात दिली. गुरूवारी जवान चित्रपटाने तब्बल 5 कोटींचे कलेक्शन करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. जवान चित्रपटाने आतापर्यंत हिंदीमध्ये एकून कलेक्शन 525.5 कोटींचे कलेक्शन केले. आता हिंदीमधील टाॅप तीन चित्रपटांची पुढे आली आहेत. विशेष म्हणजे यांच्यामध्ये मोठी स्पर्धा ही बघायला मिळतंय.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटानंतर सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट दुसऱ्या क्रमाकांवर कमाई करणारा चित्रपट ठरलाय. पठाणनंतर जवान या चित्रपटाने ज्यापद्धतीने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. त्यानुसार हे स्पष्ट आहे की, शाहरुख खान याची अजूनही एक हवा बाॅक्स आॅफिसवर नक्कीच आहे.

जवान या चित्रपटाने 22 व्या दिवशीपर्यंत बाॅक्स आॅफिसवर तब्बल 582 कोटींची हिंदीमधून कमाई केलीये. इतकेच नाही तर अजून शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट रिलीज होणे शिल्लक आहे. शाहरुख खान याने आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनची स्टाईलही बदलल्याचे दिसतंय. पूर्वीप्रमाणे शाहरुख खान हा विविध शहरांमध्ये जाऊन चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसत नाहीये.

शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसतोय. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खास सेशनचे आयोजन करताना दिसतोय. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसतो. शाहरुख खान याचे चित्रपट मोठे धमाके करत आहेत.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादात सापडला. मात्र, प्रत्यक्षात रिलीज झाल्यानंतर या वादाचा फायदा हा चित्रपटाला झाल्याचे बघायला मिळाले. पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण हिने एका गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.