Ask SRK : तो मला जावयासारखा; टीम इंडियातील एका क्रिकेटपटूविषयी शाहरुखचं वक्तव्य

शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनअंतर्गत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी नेटकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं त्याने मोकळेपणाने दिली. अशातच शाहरुखने टीम इंडियातील एका क्रिकेटरबद्दल केलेल्या कमेंटची सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.

Ask SRK : तो मला जावयासारखा; टीम इंडियातील एका क्रिकेटपटूविषयी शाहरुखचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 9:21 AM

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या वर्षात त्याचे एकानंतर एक सलग दोन चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. यानिमित्ताने बुधवारी संध्याकाळी त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. ‘आस्क एसआरके’ या सेशनअंतर्गत त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनदरम्यान काही नेटकऱ्यांनी शाहरुखला गमतीशीर प्रश्न विचारले. किंग खाननेही त्यांची उत्तरं आपल्याच खास अंदाजात दिली. एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने टीम इंडियातील एका क्रिकेटपटूला आपला जावयासारखा असल्याचं म्हटलं आहे.

तो मला जावयासारखा..

एका युजरने शाहरुखला विचारलं, ‘विराट कोहलीबद्दल काहीतरी बोल. प्रत्येक दिवशी आम्हाला चाहत्यांमध्ये वाद होताना पहायला मिळतं. तू तुझ्या जवान या चित्रपटाच्या स्टाइलमध्ये विराटबद्दल काही बोल.’ त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याने लिहिलं, ‘मी विराटवर खूप प्रेम करतो. तो माझा आपलाच आहे. मी नेहमीच त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो. भाऊ तो मला जावयासारखा आहे.’ विराटबद्दलची शाहरुखची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

शाहरुखची उत्तरं

हे सुद्धा वाचा

वर्ल्ड कपविषयी काय म्हणाला?

याशिवाय आणखी एका चाहत्याने शाहरुखला वर्ल्ड कपविषयी प्रश्न विचारला. ‘सर वर्ल्ड कपसाठी ऑल द बेस्ट बोला.’ त्यावर शाहरुखने पुढे लिहिलं, ‘इंडिया… इंडिया.. क्रिकेटर्सना ऑल द बेस्ट. वर्ल्ड कपचा सामना अत्यंत दमदार असेल. ऑल द बेस्ट.’ शाहरुखच्या अशाच दमदार उत्तरांमुळे नेहमीच त्याचं ‘आस्क एसआरके’ सेशन सोशल मीडियावर गाजतं. त्याची उत्तरं चर्चेत असतात.

जवानच्या कलेक्शनबद्दल कमेंट

या सेशनअंतर्गत एका युजरने ‘जवान’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल शाहरुखला प्रश्न विचारला. जवानच्या खोट्या कलेक्शन नंबरविषयी काय बोलशील? कलेक्शनचा हा आकडा बनावट असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी वाचायला मिळत आहे, असा सवाल संबंधित युजरने केला. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘गप्प बस आणि फक्त मोजत रहा. मोजताना विचलित होऊ नकोस.’

किंग खान लवकरच राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो सलमान खानच्या ‘टायगर 3’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.