Pathaan: “पठाणसाठी शाहरुखनं माझी हेअरस्टाईल चोरली”; अभिजीत बिचुकलेचा अजब दावा

सलमाननंतर शाहरुख खानशी भिडला बिचुकले; म्हणाला "पठाणमध्ये माझा लूक कॉपी केला"

Pathaan: पठाणसाठी शाहरुखनं माझी हेअरस्टाईल चोरली; अभिजीत बिचुकलेचा अजब दावा
Abhijeet Bichukle and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 9:19 AM

सातारा: ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक अभिजीत बिचुकले नेहमी त्याच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानवर कॉपी केल्याचा आरोप केला आहे. शाहरुखने त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटासाठी माझी हेअरस्टाइल चोरली, असं बिचुकलेनं म्हटलंय. साताऱ्याच्या अभिजीत बिचुकलेच्या वक्तव्याची चर्चा झाली नाही म्हणजे नवलच! सलमाननंतर आता बिचुकले थेट शाहरुखला भिडल्याने त्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

साताऱ्यात माध्यमांशी बोलताना बिचुकले म्हणाला, “मला वाटतं की शाहरुख खान बिग बॉस हा शो बघत होता. त्यात माझी हेअरस्टाइल बघून त्याने पठाणमधील लूकसाठी तो कॉपी केला. शाहरुखचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखाच आहे. पण ही एक सकारात्मक बाब आहे.”

“मी लहान असताना 1991 मध्ये संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तचे तसे लांब केस होते. तेव्हा ती हेअरस्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. पण आता 2022 मध्ये जी हेअरस्टाइल लोकप्रिय झाली आहे, ती माझी आहे. सलमान खानचा बिग बॉस हा शो शाहरुखने बघितला असावा. त्यामुळे त्याने पठाण चित्रपटात केलेली हेअरस्टाइल माझीच आहे”, असं बिचुकले पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

अभिजीत बिचुकलेनं बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर हिंदी बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये त्याची वाईल्ड कार्डद्वारे एण्ट्री झाली होती. बिचुकले स्वत:ला अभिनेता, लेखक, गायक, गीतकार आणि संगीतकार म्हणतो. बिग बॉसच्या घरात असतानाही बिचुकलेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.