Shah Rukh Khan: शाहरुखला चाहत्याने विचारला असा प्रश्न; थेट मुंबई पोलिसांना द्यावं लागलं उत्तर

ट्विटरवर शाहरुखच्या चाहत्याने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिलेल्या कडक उत्तराची होतेय चर्चा

Shah Rukh Khan: शाहरुखला चाहत्याने विचारला असा प्रश्न; थेट मुंबई पोलिसांना द्यावं लागलं उत्तर
शाहरुख खान
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 2:31 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ट्विटरवरील अकाऊंटला नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्याने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी किंग खानला बरीच प्रश्नं विचारली. या प्रश्नांची उत्तर त्याने अत्यंत मजेशीर पद्धतीने दिली. मात्र त्याला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर थेट मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर मिळालं आहे. हे उत्तर सध्या ट्विटरवर चांगलंच व्हायरल होत आहे.

चाहत्याने शाहरुखला जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यालाही कल्पना नसेल की त्यावर थेट मुंबई पोलीस उत्तर देतील. #AskSRK सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला विचारलं, ‘सर एक ओटीपी आला असेल तुम्हाला, जरा मला सांगा’. त्यावर शाहरुखनेही हटके उत्तर दिलं. ‘बेटा, मी इतका प्रसिद्ध आहे की मला ओटीपी नाही मिळत, जेव्हा मी ऑर्डर करतो तेव्हा वेंडर थेट मला सामान पाठवतात. तुम्ही तुमचं बघून घ्या’, असं उत्तर बॉलिवूडच्या बादशाहने दिलं.

शाहरुखचं हे उत्तर चाहत्यांना खूपच आवडलं. मात्र त्याच्या याच उत्तराखाली मुंबई पोलिसांनी लगेच कमेंट करत लिहिलं ‘100’. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

या सेशनदरम्यान शाहरुखने दिलेली इतरही काही उत्तरं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तू कोणाकडून प्रेरणा घेतो, असं एका चाहत्याने त्याला विचारलं. यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘मी याआधीही हे सांगितलं आहे की मी सर्वसामान्य लोकांपासून प्रेरणा घेतो, यशस्वी लोकांकडून नाही. सामान्य असणंच खास आहे.’

शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.