Jawan Leaked | ‘जवान’ प्रदर्शित होताच शाहरुखला मोठा झटका; या साइट्सवर HD प्रिंटमध्ये चित्रपट लीक

एकीकडे शाहरुख खानच्या 'जवान'ला सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळत असून दुसरीकडे किंग खानसाठी वाईट बातमी समोर येत आहे. 'जवान' हा चित्रपट ऑनलाइन एचडी प्रिंटमध्ये लीक झाल्याचं कळतंय.

Jawan Leaked | 'जवान' प्रदर्शित होताच शाहरुखला मोठा झटका; या साइट्सवर HD प्रिंटमध्ये चित्रपट लीक
JawanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 3:19 PM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट अखेर आज (गुरुवार) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना आणि कलाकारांनाही प्रचंड अपेक्षा आहेत. जवानच्या प्रिव्ह्यू आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. किंग खानच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्येही प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. गुरुवारी सकाळपासूनच थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. ट्विटरवरही चित्रपटाबाबत विविध प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट जगभरात कमाईचा शंभर कोटींचा आकडा पार करणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. यादरम्यान ‘जवान’ चित्रपटासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट ऑनलाइन साइट्सवर लीक झाल्याचं कळतंय.

एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक

मीडिया रिपोर्टनुसार प्रदर्शनाच्या काही तासांतच ‘जवान’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट तमिळ रॉकर्स, एमपी फोर मुव्हीज, वेगा मूव्हीज आणि फिल्मीझिला या साइट्सवर फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मातांना कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शाहरुखचा चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याचा पठाण हा चित्रपटसुद्धा ऑनलाइन लीक झाला होता. असं असूनही त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

कमाईवर होणार फटका?

जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखने यावर्षी ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. त्याच्या काही महिन्यातच त्याचा ‘जवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाविषयी अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रचंड उत्सुकता आहे. पठाणच्या कमाईचा रेकॉर्ड जवान हा चित्रपट मोडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. इतकंच नव्हे तर जवानची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार झाली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी 17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये शाहरुखसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय दीपिका पादुकोण. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.