तेरा कोटींची खरेदी, आताची किंमत 200 कोटींहून अधिक; शाहरुख खान ते प्रियांका चोप्रा.. पहा सेलिब्रिटींच्या बंगल्यांची किंमत

मन्नतमध्ये शिफ्ट होण्याआधी तो अमृत नावाच्या एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये राहायचा. या फ्लॅटमध्ये कोणतीही आलिशान सुविधा उपलब्ध नव्हती. शाहरुख-गौरीचं हे घर सर्वसामान्यांप्रमाणे होतं.

तेरा कोटींची खरेदी, आताची किंमत 200 कोटींहून अधिक; शाहरुख खान ते प्रियांका चोप्रा.. पहा सेलिब्रिटींच्या बंगल्यांची किंमत
Celebrity BungalowsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 12:41 PM

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींची आलिशान लाइफस्टाइल ही चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरते. इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे कठोर मेहनत केल्यानंतर, कोट्यवधींची संपत्ती कमावल्यानंतर शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींनी स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी महागडे घर खरेदी केले आहेत. मुंबईतील काही सेलिब्रिटींची घरं की चाहत्यांसाठी आणि पर्यटकांसाठी जणू सेल्फी पॉईंटच ठरली आहेत. यात शाहरुखचा ‘मन्नत’, सलमानचा ‘गॅलेक्सी’, बिग बींचा ‘जलसा’ या बंगल्यांचा आणि अपार्टमेंट्सचा समावेश आहे. या बंगल्यांची आजची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील.

हिंदी सिनेसृष्टीत शाहरुख खानची बातच काही और आहे. जवळपास तीस वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. याच चित्रपटांच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात त्याचा ‘मन्नत’ नावाचा बंगला आहे. 2001 मध्ये त्याने 13.32 कोटी रुपयांचा हा बंगला विकत घेतला होता. या सहा मजली आलिशान बंगल्याची आजची किंमत तब्बल 200 कोटी रुपयांहून अधिक आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानने या घराचं इंटेरिअर डिझायनिंग केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मन्नत बंगला खरेदी करण्यापूर्वी शाहरुख त्याच्या पत्नीसोबत एका फ्लॅटमध्ये राहायचा. हा फ्लॅट वांद्रे याठिकाणी समुद्रकिनारी होता. एका मुलाखतीदरम्यान शाहरुखने या फ्लॅटचा उल्लेखसुद्धा केला होता.

शाहरुख खानचा बंगला

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

मन्नतमध्ये शिफ्ट होण्याआधी तो अमृत नावाच्या एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये राहायचा. या फ्लॅटमध्ये कोणतीही आलिशान सुविधा उपलब्ध नव्हती. शाहरुख-गौरीचं हे घर सर्वसामान्यांप्रमाणे होतं. मन्नतमध्ये राहायला गेल्यानंतर शाहरुखने त्याचा फ्लॅट भाडेतत्त्वावर दुसऱ्यांना राहायला दिला.

अमिताभ बच्चन यांचा बंगला

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे मुंबईत ‘जलसा’ या बंगल्यात कुटुंबीयांसोबत राहतात. बिग बी हा बंगला खरेदी करू शकले नव्हते असं म्हटलं जातं. सत्ते पे सत्ता या चित्रपटात काम केल्यानंतर रमेश सिप्पी यांनी बिग बींना ‘जलसा’ बंगला भेट म्हणून दिला होता. या बंगल्याची किंमत जवळपास 100 ते 120 कोटी रुपये आहे.

अक्षय कुमारचं आलिशान घर

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचं घर मुंबईतील जुहू बीचजवळ आहे. त्याच्या घराची किंमत जवळपास 80 कोटी रुपये असल्याचं कळतंय. अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. तिचं केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही घर आहे. निक जोनासशी लग्न केल्यानंतर तिने लॉस एंजिलिसमध्ये 20 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 164 कोटी रुपयांचं आलिशान घर विकत घेतलं.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.