Shah Rukh Khan | “हा माझा पहिला अन् शेवटचा चित्रपट..”; शाहरुखच्या वक्तव्याने चाहते चकीत!

दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवर शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधताना मोठा खुलासा केला. तो म्हणाला, "जवान हा माझा पहिला आणि शेवटचा असा चित्रपट असेल ज्यामध्ये.."

Shah Rukh Khan | हा माझा पहिला अन् शेवटचा चित्रपट..; शाहरुखच्या वक्तव्याने चाहते चकीत!
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 9:17 AM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘जवान’च्या टीमकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं जात आहे. 31 ऑगस्ट रोजी दुबईतील बुर्ज खलिफावर ‘जवान’चा ट्रेलर दाखवण्यात आला होता. या खास कार्यक्रमाला शाहरुख खान, दिग्दर्शक अटली आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध उपस्थित होते. या कार्यक्रमात शाहरुखची एण्ट्री होण्यापूर्वी काही परफॉर्मर्सकडून ‘झिंदा बंदा’ गाण्यावर डान्स परफॉर्म करण्यात आला होता. त्यानंतर किंग खानने त्याच्या स्टाइलमध्ये एण्ट्री केली आणि तोसुद्धा या गाण्यावर थिरकला. या कार्यक्रमात शाहरुखने ‘चलेया’ गाण्याचा अरेबिक व्हर्जनसुद्धा लाँच केला. बुर्ज खलिफावर ट्रेलर लाँच झाल्यानंतर शाहरुख त्याच्या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

“हा माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट..”

‘जवान’ या चित्रपटासाठी शाहरुखने विशेष मेहनत घेतली आहे. कारण यामध्ये तो सहा ते सात विविध लूकमध्ये दिसणार आहे. या सर्व लूक्सची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. यावेळी टक्कल असलेल्या लूकबद्दलही शाहरुख व्यक्त झाला. “मी या चित्रपटासाठी टक्कलसुद्धा केलं आहे. असं मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच करणार नाही. हा माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल, ज्यामध्ये मी टक्कल असलेल्या लूकमध्ये दिसत असेन. आता मी तुमच्यासाठी हेसुद्धा केलं आहे. त्यामुळे किमान त्यासाठी तरी तुम्ही हा चित्रपट पहायला थिएटरमध्ये जा. मला पुन्हा त्या लूकमध्ये पहायची संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही”, असं तो मस्करीत म्हणतो.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

‘जवान’च्या ट्रेलरमधील डायलॉग व्हायरल

‘जवान’च्या ट्रेलरमधील शाहरुखचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय. नेटकरी या डायलॉगचं कनेक्शन एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी जोडत आहेत. ‘जवान’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या अखेरीस शाहरुखचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.” शाहरुखचा हाच डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.