AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan ची ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात? पाकिस्तानमध्ये लग्नाच्या तुफान चर्चा

Shah Rukh Khan | रणबीर कपूर याच्यासोबत खासगी फोटो व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेली 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात! पाकिस्तानात तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

Shah Rukh Khan ची 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात? पाकिस्तानमध्ये लग्नाच्या तुफान चर्चा
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 8:46 AM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्याचं पहिलं घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीसोबत नव्या संसाराची सुरुवात केली. तर काही सेलिब्रिटींमात्र एकटं राहण्याचा निर्णय घेतला. पण आता एका अशा अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जिने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली आणि ती अभिनेत्री अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये देखील होती. एवढंच नाही तर, दोघांचे अनेक खासगी फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता देखील अभिनेत्री चर्चेत आली आहे, पण तिच्या दुसऱ्या लग्नामुळे.. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान २०२३ मध्ये दुसरं लग्न करणार असल्याची शक्यता आहे.

माहिरा गेल्या एक वर्षांपासून बॉयफ्रेंड सलीम कॅरीन याला डेट करत आहे. आता दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, माहिरा २०२३ मध्ये सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहे. सलीम कॅरीन आणि माहिरा खान यांच्या लग्नात फक्त मित्र-परिवार आणि कुटुंब उपस्थित राहणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.

सलीम कॅरीन आणि माहिरा यांचं लग्न पंजाब येथील एका हिल स्टेशनवर करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ‘रईस’ फेम अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. पण अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. माहिराने महिन्याच्या सुरुवातीला तिच्या इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडबद्दल वक्तव्य केलं होतं.

‘हमसफर’ मालिकेतील एका डायलॉगचा संदर्भ देत अभिनेत्रीने बॉयफ्रेंड सलीम याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. मालिकेतील अभिनेता माहिरा हिला म्हणतो, ‘पता नहीं तुम मुझे किस नेकी के बदले में मिली हो….’, सलिम याच्यासाठी माझ्या मनात अशा भावना आहेत… असं देखील अभिनेत्री लाईव्हमध्ये म्हणाली… सध्या सर्वत्र माहिरा हिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत.

माहिरा हिच्या पहिल्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीचं पहिलं लग्न अली अस्करी याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. २०१५ मध्ये माहिरा आणि अली यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अली आणि माहिरा यांना एक मुलगा देखील आहे. पण २०१७ मध्ये माहिरा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती.

२०१७ मध्ये माहिरा आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. परदेशात दोघे सिगारेट पिताना दिसत होते. माहिराने २०१७ मध्ये शाहरुख खानसोबत रईसमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर माहिरा यशाच्या शिखरावर पोहोचेल असं देखील सांगण्यात येत होतं. मात्र त्यानंतरच पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर माहिरा इतर कोणत्याही भारतीय प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.