Shah Rukh Khan | ‘हा कसला माज’, एअरपोर्टवरील शाहरुख खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

झिरो या चित्रपटानंतर तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखचा 'पठाण' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली.

Shah Rukh Khan | 'हा कसला माज', एअरपोर्टवरील शाहरुख खानचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 11:09 AM

मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्याला जोरदार ट्रोल केलं जातंय. शाहरुखला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. चाहत्यांच्या घोळक्यातून शाहरुख पुढे जात असताना एक व्यक्ती त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या व्यक्तीसोबत शाहरुखची वागणूक पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘पठाणच्या यशानंतर शाहरुखला माज आला आहे’, असं नेटकरी म्हणत आहेत.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख एअरपोर्टमधून बाहेर येताना दिसत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. एक चाहता हातात फोन घेऊन शाहरुखसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या जवळ जातो. तितक्यात शाहरुख त्याचा हात झटकतो. त्यानंतर शाहरुखचा बॉडीगार्ड त्या व्यक्तीला मागे ढकलतो. त्याकडे दुर्लक्ष करत शाहरुख चाहत्यांच्या घोळक्यातून त्याच्या गाडीच्या दिशेने चालू लागतो.

हे सुद्धा वाचा

शाहरुखचं हे कृत्य पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत राग व्यक्त केला आहे. ‘यांचे चित्रपट आणखी हिट करा आणि त्यांचा भाव वाढला’, असं एकाने लिहिलं. तर ‘यांना पब्लिकनेच उभं केलंय तरी हा कसला माज आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘इतक्या वर्षांनंतर एक हिट चित्रपट दिल्यामुळे शाहरुखचा घमंड दिसतोय’, असंही काहींनी म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ

झिरो या चित्रपटानंतर तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखचा ‘पठाण’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली. पठाणने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडले आहेत. पठाण हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. त्यानंतर आता शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवान जर हिट झाला तर शाहरुख आणखीनच ॲटिट्यूड दाखवणार, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.