शाहरुखचा वारसा हाच चालवणार; 10 वर्षीय अबरामचा शाळेत जबरदस्त परफॉर्मन्स पाहून भारावले नेटकरी

शाहरुख आणि गौरीचा मुलगा अबराम दहा वर्षांचा असून नुकतंच त्याने शाळेच्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्म केलं. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेला शाहरुख त्याच्याकडे कौतुकाने पाहत होता. अबरामच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

शाहरुखचा वारसा हाच चालवणार; 10 वर्षीय अबरामचा शाळेत जबरदस्त परफॉर्मन्स पाहून भारावले नेटकरी
Shah Rukh Khan's son AbramImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 10:06 AM

मुंबई : 16 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे शाहरुखची मुलगी सुहाना खानने नुकतंच ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे स्वत: शाहरुख त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अशातच शाहरुखचा छोटा मुलगा अबराम यानेसुद्धा शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सर्वांचं लक्ष वेधलं. बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सप्रमाणेच अबरामसुद्धा धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतोय. नुकताच या शाळेचा वार्षिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अबरामने एक नाटक सादर केलं. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे स्टेजवर परफॉर्म करताना 10 वर्षांच्या अबरामने शाहरुखचा आयकॉनिक पोझ केला आणि त्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुखनेही प्रतिक्रिया दिली.

अबराम स्टेजवर अभिनय करत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेले शाहरुख, गौरी आणि सुहाना त्याच्याकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. त्याचवेळी जेव्हा अबराम वडिलांची पोझ करतो, तेव्हा शाहरुख आनंदाने हात वर करताना दिसून येतो. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अबरामच्या परफॉर्मन्सवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हा सुहाना खानपेक्षा चांगलं अभिनय करतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘शाहरुखचा वारसा हा पुढे चालवणार’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘छोटा शाहरुख’ अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी अबरामचं कौतुक केलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

अबरामने केली शाहरुखची आयकॉनिक पोझ

शाळेच्या या वार्षिक कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्यानेही परफॉर्म केल्याचं पहायला मिळालं. आराध्यानेही स्टेजवर एक नाटक सादर केलं होतं. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आराध्याला परफॉर्म करताना पाहून नेटकऱ्यांना सुरुवातीच्या काळातील ऐश्वर्याची आठवण झाली. या शाळेत शाहिद कपूर, करीना कपूर यांचीही मुलं शिकतात. शाहिदची मुलगी मिशा नऊवारी साडीत दिसून आली. शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात तिने मराठी गाण्यावर डान्स केला असावा, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. तर दुसरीकडे करीनाचा मुलगा तैमुरलाही वेशभूषेत पहायला मिळालं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.