Shah Rukh Khan चा सर्वत्र बोलबाला; 3 दिवसात ‘जवान’ सिनेमाने रचला विक्रम

Shah Rukh Khan | 'जवान' सिनेमा प्रदर्शित होताच सर्व सिमेमाची हवा गुल; शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमाने तीन दिवसात कमावले इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Shah Rukh Khan चा सर्वत्र बोलबाला; 3 दिवसात 'जवान' सिनेमाने रचला विक्रम
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 7:55 AM

मुंबई : 10 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) प्रदर्शित झाला आणि अन्य सिनेमांची बॉक्स ऑफिसवर हवा गुल झाली आहे. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान पुन्हा बॉक्स ऑफिसचा बादशहा झाला आहे. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाने फक्त दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. आता ‘जवान’ सिनेमाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर येत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. शनिवार असल्यामुळे ‘जवान’ सिनेमाच्या कमाईने वेग धरला.. आज रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

तिसऱ्या दिवशी ‘जवान’ सिनेमाने कमावले इतके कोटी

रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ‘जवान’ सिनेमाने देशात जवळपास ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ६६ कोटी हिंदी भाषा, ५ कोटी तमिळ आणि ३.५ कोटी तेलुगू भाषेचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी बंपर कमाई केल्यानंतर शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

‘जवान’ सिनेमाने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली असून सिनेमाने तीन दिवसांत २०२.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सांगायचं झालं तर, ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अशात तीन दिवसांत सिनेमाने २०० कोटी रुपयांचा गल्ला पार केल्यामुळे किंग खान याने वेगळा विक्रम रचला आहे.

हे सुद्धा वाचा

सिनेमात किंग खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अभिनेता बाप – मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. किंग खान याची दुहेरी भूमिका चाहत्यांना फार आवडली आहे. सिनेमात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय ‘जवान’ सिनेमात अभिनेता एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

‘जवान’ सिनेमाबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. सिनेमा मल्टी स्टारर असल्यामुळे चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.