Shah Rukh Khan | ‘त्या’ घटनेनंतर किंग खान याला सतावत होती पत्नीला गमावण्याची भीती!

Shah Rukh Khan | लग्नानंतर शाहरुख खान याच्या आयुष्यात आलेलं मोठं संकट, सतत पत्नीला गमावण्याची किंग खान याच्या मनात होती, तेव्हा नक्की झालं तरी काय होतं? अभिनेत्याच्या आयुष्यातील खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

Shah Rukh Khan | 'त्या' घटनेनंतर किंग खान याला सतावत होती पत्नीला गमावण्याची भीती!
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 1:27 PM

मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये फार कमी कपल आहेत, ज्यांच्या नात्यात कधी अडचणी आल्या नाहीत. अशाच कपलपैकी एक म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान.. शाहरुख कायम त्याच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. किंग खान याचे भरतातच नाही तर जगभरात चाहते असल्यामुळे अभिनेत्याच्या आयुष्यातील खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज गौरी खान हिचा वाढदिवस असल्यामुळे अनेक किस्से सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

शाहरुख खान याच्यासाठी पत्नी सर्वकाही आहे. शाहरुख आणि गौरी यांच्या लव्हस्टोरीबद्दल तर अनेकांना माहिती आहे. एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे दोघांची लव्हस्टोरी आहे. दरम्यान ३० सप्टेंबर १९९८ साली ‘फिल्मफेअर’ ला दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खान याने आयुष्यातील सर्वात वाईट क्षणाबद्दल सांगितलं.

आर्यन खान याच्या जन्मावेळी गौरी हिचा प्रकृती खालावली होती. तेव्हा अभिनेता प्रचंड घाबरला आहे. पत्नीची प्रकृती पाहून गौरी हिला आपण आता गमावू अशी भीती किंग खान याच्या मनात होती. सध्या सर्वत्र शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा गौरी ऑपरेशन थिएटरमध्ये होती, तेव्हा तिची प्रकृती पाहून असं वाटलं की गौरी आता अखेरचा श्वास घेईल. मी माझ्या आई – वडिलांना रुग्णालयात अखेरचा श्वास घेताना पाहिलं होतं. म्हणून रुग्णालयाबद्दल माझ्या मनात एक भीती बसली होती आणि मला रुग्णालयाची प्रचंड भीती वाटत होती. ‘

‘आर्यन याच्या जन्मावेळी मी प्रचंड घाबरलो होते. कारण गौरी हिची प्रकृती खालावली होती. गौरीला वेदना सहन होत नव्हत्या. रुग्णायलात गौरीला अशा अवस्थेत पाहणं माझ्यासाठी प्रचंड कठीण होतं. तेव्हा मी होणाऱ्या बाळाची बिलकूल चिंता केली नाही. तेव्हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त गौरी महत्त्वाची होती.. असं डॉक्टरांना देखील स्पष्ट सांगितलं होतं…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘मला माहिती होतं मुल जन्माला येताना आईला वेदना होतात, पण काहीही होत नाही, पण तरी देखील माझ्या मनात भीती होती. अशा परिस्थितीत सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, पत्नीसोबत खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.. शाहरुख खान याच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे… अभिनेता कायम सोशल मीडियावर कुटुंंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्त करत असतो…

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.