एअरपोर्टवर शाहरुखला रोखलं? वृत्तामागील सत्य आलं समोर, बॉडीगार्डची झाली चौकशी

जाणून घ्या, शाहरुखसोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

एअरपोर्टवर शाहरुखला रोखलं? वृत्तामागील सत्य आलं समोर, बॉडीगार्डची झाली चौकशी
शाहरुख खान
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 3:22 PM

मुंबई- अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या टीमला मुंबई विमानतळावर थांबवल्याचं वृत्त समोर आलं होतं. 18 लाख रुपयांच्या महागड्या घडाळ्यांसाठी शाहरुखला 6.83 लाख रुपये दंड ठोठावल्याचं म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भातील महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. “शाहरुख आणि त्याच्या टीमला ते घेऊन जात असलेल्या वस्तूंसाठी ड्युटी भरण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र यासाठी कोणताही दंड किंवा अडवणूक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर जे म्हटलं जातंय, त्यात तथ्य नाही”, अशी माहिती एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने ‘ई टाइम्स’शी बोलताना दिली.

शाहरुख खान, त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि त्यांची टीम कलिना इथल्या खासगी टर्मिनलवरून प्रवासासाठी निघाले होते. ज्याला जीए (जनरल एव्हिएशन) टर्मिनल असं म्हणतात. तर T2 या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरून दररोज शेकडो उड्डाणं होतात. जेव्हा कधी ड्युटी किंवा इतर कोणतंही शुल्क भरण्याचं प्रकरण असतं, तेव्हा GA टर्मिनलमधून प्रवाशांना T2 कडे नेलं जातं. कारण अशी परिस्थिती हाताळणारे कर्मचारी आणि सुविधा या T2 टर्मिनलवर असतात. GA टर्मिनलवरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 10-12 असल्याने तिथे या सुविधांचा विस्तार केला गेला नाही, असं संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं?

घटलेल्या घटनेविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, “शाहरुख आणि त्याची टीम GA टर्मिनलवर दुपारी 12.30 वाजता पोहोचली होती. त्यांच्याकडे सहा ते सात पिशव्या होत्या. त्यात महागडी घड्याळं ठेवण्याचे बॉक्स आणि एक ॲपल वॉच होतं. या वस्तूंच्या पावत्या त्यांच्याकडे नव्हत्या. त्या भेटवस्तू म्हणून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या वस्तूंची किंमत इंटरनेटवर शोधली असता ती किंमत एकत्रितपणे 17.86 लाख रुपये इतकी झाली.”

हे सुद्धा वाचा

शाहरुख खान महागडी घड्याळं घेऊन जात होता, असे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र ती घड्याळं नसून महागडी घड्याळं ठेवण्याचे बॉक्स होते, असं अधिकाऱ्याने सांगितलं. “शाहरुखच्या टीममधील बॉडीगार्ड रवी सिंगला बॅगसह घेऊन जाण्यात आलं. त्या बॅगेत कस्टम ड्युटी भरण्यासाठीचं सामान होतं. रवीने T2 टर्मिनलवर 6.88 लाख रुपये सीमा शुल्क भरले”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.