WhatsApp नंबर मागणाऱ्या चाहतीला शाहरुखचं भन्नाट उत्तर; ‘पठाण’बद्दलही केलं खास ट्विट

चाहतीने किंग खानकडे मागितला WhatsApp नंबर; शाहरुखने दिलेलं उत्तर एकदा वाचाच!

WhatsApp नंबर मागणाऱ्या चाहतीला शाहरुखचं भन्नाट उत्तर; 'पठाण'बद्दलही केलं खास ट्विट
Shah Rukh KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 8:32 AM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानने नुकताच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे या चित्रपटातील गाण्यावर वाद सुरू असताना दुसरीकडे किंग खानने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची आपल्याच खास अंदाजात दिली. ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनमध्ये शाहरुख नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं देतो. या सेशनदरम्यान एका चाहतीने शाहरुखला त्याचा WhatsApp नंबर मागितला. त्यावर किंग खानने दिलेलं थेट उत्तर चर्चेत आलं आहे.

‘तू तुझा WhatsApp नंबर देऊ शकतोस का? तुमच्याशी बोलून झाल्यानंतर मी पुन्हा तो नंबर डिलित करेन’, असं एका चाहतीने विचारलं. त्यावर शाहरुखने उत्तर दिलं, ‘मी फोन आणि मेसेजवर फारसा बोलत नाही.’

हे सुद्धा वाचा

शाहरुखने दिलेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरं-

प्रश्न: तुझ्यासाठी या विश्वाचा अर्थ काय आहे? उत्तर: माझी मुलं

प्रश्न: सलमान खानचा तुझा सर्वांत आवडता चित्रपट? उत्तर: बजरंगी भाईजान

प्रश्न: (हा प्रश्न नंतर डिलिट करण्यात आला) उत्तर: चांगलं काम करून कमावण्यात अर्ध आयुष्य गेलं, तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात अशीच कमाई करा यासाठी शुभेच्छा

प्रश्न: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत येतेय, तुझा ‘मन्नत’ बंगला पाहण्यासाठी.. उत्तर: माझ्या बंगलाचा गेट तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो, जो गौरीने डिझाइन केला आहे.

प्रश्न: वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा द्या उत्तर: फक्त सुरुवात करा आणि सात दिवस सातत्याने करा, सवय लागेल. स्वत:साठी हे करत राहाल तर सर्व शक्य आहे.

प्रश्न: तू स्वदेश, चक दे इंडिया यांसारखे चित्रपट का बनवत नाहीस? उत्तर: बनवले तर आहेत, आता आणखी किती बनवू?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.