Shahid Kapoor | ‘कबीर सिंग’मध्ये प्रितीच्या कानाखाली मारणं कितपत योग्य? शाहिद कपूरने दिलेलं उत्तर चर्चेत

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंग' या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने जवळपास 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Shahid Kapoor | 'कबीर सिंग'मध्ये प्रितीच्या कानाखाली मारणं कितपत योग्य? शाहिद कपूरने दिलेलं उत्तर चर्चेत
Kabir SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 11:46 AM

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर हा बॉलिवूडमधल्या दमदार अभिनेत्यांमध्ये गणला जातो. नुकताच तो ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. शाहिदने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अशा बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. कियारा अडवाणीसोबतचा त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या दोघांच्या नव्या जोडीलाही चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र यातील एका सीनवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या सीनमध्ये कबीर त्याच्या गर्लफ्रेंडच्या म्हणजेच प्रितीच्या कानाखाली मारतो. मुलीवर हात उचलल्याच्या या सीनवरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर आता शाहिदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, “ही एक अत्यंत साधी मुलगी आणि हुशार, आक्रमक, अस्वस्थ मुलाची प्रेमकहाणी होती. अशा गोष्टी रोजच्या जीवनात घडतच असतात. देवदासचं उदाहरण द्यायचं झाल्यास, प्रत्येक नायक हा चांगला माणूसच असेल असं नाही. देवदास जसं पारोचं शारीरिक शोषण करत होता, तसा तो खरा व्यक्ती नव्हता. मीसुद्धा माझ्या लहानपणा शारीरिक शोषण होताना पाहिलंय. देवदास हा उत्तम चित्रपट आहे. पण त्याचप्रमाणे कबीर सिंगच्या व्यक्तिरेखेकडे मी हिरो किंवा अँटी-हिरो म्हणन पाहत नाही. मी त्याच्याकडे चित्रपटाचा नायक म्हणून पाहतो. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्रेमात आपल्याकडून कधीच कोणती चूक झाली नाही का? आपण सर्वजण परफेक्ट व्यक्ती आहोत का?”

कबीर सिंगच्या पात्राविषयी तो पुढे म्हणाला, “प्रत्येकजण दुसऱ्या संधीस पात्र आहे, मग ती व्यक्ती कितीही वाईट का असेना. जर तुम्ही म्हणत असाल की हा माणूस चांगला आहे आणि त्याने आजपर्यंत सर्वकाही चांगलंच केलं. तर असं कोणीही म्हणत नाही. तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर त्यात असंच म्हटलं गेलंय की तो अस्वस्थ आहे. तो स्वत: एक समस्या आहे. रागावर नियंत्रण न ठेवण्याची मोठी समस्या त्याला आहे. त्याला समाज स्वीकारू शकत नाही आणि तो स्वत: विनाशकारी आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच आम्ही हे स्पष्ट केलंय की हा चित्रपट अशा प्रकारच्या पात्रावर आधारित आहे. कुठेच तो महान आहे असं म्हटलं नव्हतं. पण मला वाटतं काही लोकांना तो चुकीचा किंवा बरोबर वाटू शकतो. जीवनात सर्व प्रकारच्या गोष्टी घडतात आणि आपण त्या पडद्यावर दाखवू शकतो.”

हे सुद्धा वाचा

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने जवळपास 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.