Shahid Kapoor | कोविडच्या काळात सासू-सासऱ्यांनी नाही सोडली जावयाची साथ; शाहिद पत्नीच्या कुटुंबाबद्दल म्हणाला…
पत्नी मीरा राजपूत हिच्या आई - वडिलांसोबत कसं आहे अभिनेता शाहिद कपूर याचं नातं? कोविड काळातील 'ते' खास क्षण आणि सासू-सासऱ्यांबद्दल अभिनेता म्हणाला...
मुंबई | कोविडच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत मोठा काळ व्यतीत केला. अभिनेता शाहिद कपूर याने देखील कुटुंबाबद्दल काही खास आठवणी सांगितल्या आहेत. शिवाय अभिनेत्याने सासू – सासऱ्यांसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शाहिद कपूर कायम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याचे पत्नी मीरा राजपूत आणि दोन मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. मीरा – शाहिद दोघे फक्त पती – पत्नी नसून खास मित्र देखील आहेत. दोघांमधील नातं चाहत्यांना देखील फार आवडतं. नुकताच अभिनेत्याने, पत्नीच्या कुटुंबियांसोबत असलेल्या नात्यावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
सासू – सासऱ्यांसोबत असलेल्या नात्यावर अभिनेता म्हणाला, मीराच्या कुटुंबियांसोबत आणि तिच्या आई – वडिलांसोबत माझे खास संबंध आहेत. मीराच्या आई-वडिलांबरोबर पहिल्या भेटीची आठवण सांगताना शाहिद म्हणाला, ‘मीराचे आई – वडील प्रतिष्ठित पण अगदी सामान्य आहेत. मीराच्या आई-वडिलांसारखे सासरचे लोक भेटल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘लॉकडाऊन दरम्यान दोन वर्ष मी पंजाबमध्ये होते. तेव्हा काही काळ सासु – सासऱ्यांसोबत घालवला. मीराचं कुटुंब सामान्य आहे. आयुष्यभर मी त्यांच्यासोबत असलेलं नातं टिकून ठेवेल…’ असं देखील शाहिद कपूर म्हणाला.
मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी कुटुंबियांच्या इच्छेने लग्न केलं. मीरा पती शाहिद कपूर याच्यापेक्षा १४ वर्ष लहान आहे. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहिद आणि मीरा यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. शाहिद याच्या मुलीचं नाव मिशा असून मुलाचं नाव झैन कपूर असं आहे.
अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिदचे पत्नी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
अनेक ठिकाणी शाहिद पत्नी मीरासोबत हजेरी लावतो. एवढंच नाही, तर अभिनेता कायम पत्नीची काळजी घेताना दिसतो. मीरा आणि शाहिद कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. दोघे दिसले, की फोटोग्राफर्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असतात. मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.