जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत किंग खान; कितव्या क्रमांकावर आहे शाहरुख खान?
टॉम क्रूझ याच्यापेक्षा अधिक श्रीमंत बॉलिवूडचा शाहरुख खान; अभिनेत्याची संपत्ती ऐकून व्हाल थक्क
मुंबई : करियरच्या सुरुवातील अनेक संघर्षांचा सामना केल्यानंतर अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या मेहमतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. शाहरुख अनेक नव्या कालाकारांच्या प्रेरणास्थानी आहे. आज अशी कोणतीच गोष्ट नाही जी किंग खानकडे नाही. प्रसिद्धी, संपत्ती यांच्या पलीकडे अभिनेत्यांच्या चाहत्यांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांचा आकडा जेवढा मोठा आहे, तेवढाच मोठा आकडा शाहरुख खानच्या संपत्तीचा आहे. शहरुख खानची नेटवर्थ प्रचंड तगडी आहे.
शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. पण नुकताच आलेल्या एका रिपोर्टमध्ये शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चैथ्या स्थानी आहे. ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शाहरुखचं नाव समोर आलं आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ट्विटर अकाउंटवरुन यादी जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख चैथ्या स्थानी आहे.
Richest actors in the world:
Jerry Seinfeld: $1 Billion Tyler Perry: $1 Billion Dwayne Johnson: $800 million Shah Rukh Khan: $770 million Tom Cruise: $620 million Jackie Chan: $520 million George Clooney: $500 million Robert De Niro: $500 million
— World of Statistics (stats_feed) January 8, 2023
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान याच्याकडे ७७० मिलियन डॉलर म्हणजे भरतीय रुपयानुसार ६ ६ हजार ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. महत्वाचं म्हणजे, शाहरुख याच्यापेक्षा अधिक चाहत्यांची संख्या असणार हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ पाचव्या स्थानावर आहे. टॉम क्रूझ याच्याकडे ५ हजार ९० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील ८ श्रीमंत अभिनेत्यांची यादी जाहिर केली आहे. यादी जाहिर झाल्यानंतर शाहरुख पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या भगव्या बिकीनीमुळे वाद शिगेला पोहोचला आहे.
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. दरम्यान, सिनेमाच्या ट्रेलरची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.