Suhana Khan | शाहरुखच्या लेकीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सुहानाच्या नव्या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाईक्स

बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. शाहरुखच्या मुलीचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Suhana Khan | शाहरुखच्या लेकीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सुहानाच्या नव्या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाईक्स
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 7:55 PM

मुंबई : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. शाहरुखच्या मुलीचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोत सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. शाहरुखच्या मुलीला चाहते आता सोशल मीडिया क्वीन म्हणत आहेत. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही वेळेपूर्वीच सुहाना खानने तिचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सुहानाने या फोटोत स्कर्ट परिधान केला आहे. त्याचा उल्लेख तिने पोस्टच्या कॅप्शनमध्येही केला आहे. या फोटोत सुहाना खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा अप्रतिम अंदाज पाहायला मिळत आहे.(Shahrukh khan’s daughter Suhana got more than a lakh likes in a few hours)

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सोशल मीडियावरील सुहानाच्या या फोटोला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या पोस्टवर सतत लाईक्सचा पाऊस पडत आहे.  तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वी सुहानाची जोरदार फॅन फॉलोइंग आहे. सुहाना न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचा शिक्षण घेते आहे. कोरोनामुळे सध्या सुहाना भारतातच आहे आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर नेहमी वेगवेगळे फोटो शेयर करते. पण काही दिवसांपूर्वी एका फोटोंमुळे तिला ट्रोल करण्यात आले होत. ट्रोलर्सने तिला पर्सनल चॅटमध्ये सुहानाचा रंग काळा असल्याचे म्हणत तिला हिणवले होते. त्या चॅट्सचे स्क्रीन शॉट तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर टाकले होते. सोबतच तिने मी माझ्या रंगावर खूश असल्याचं म्हणत वर्णभेद करणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं होतं. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, की “वर्णद्वेष हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला या मुद्द्यावर बोलायला हवं. यावर उपाय शोधायला हवा. हा मुद्दा माझ्यापुरताच सीमित नाही; तर काळा रंग असल्याने न्यूनगंड बाळगणाऱ्या सर्वांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे.” सुहानाने पुढे भारतात असलेल्या सुंदरतेच्या निकषावर बोलताना लिहलंय की, ‘तुम्ही जर गोरे आणि 5”7 उंचीचे नसाल तर छान दिसत नाही, असं जर तुमच्या परिवाराने सांगितलं असेल, तर ते फार दुर्दैवी आहे. तुम्ही गोरे नसला तरी तुम्ही छानच दिसत असता, असंही तिनं सांगितलं आहे. शेवटी रंगावरुन सौंदर्य जोखण्याचं काम बंद करुन वर्णभेद मिटवण्याचं आवाहन सुहानाने केलं होतं.

संबंधित बातम्या :

सुहाना खानची मित्रांसोबत पार्टी, फोटो व्हायरल

(Shahrukh khan’s daughter Suhana got more than a lakh likes in a few hours)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.