TMKOC: आखिरी बार सच कब बोला? मालिका सोडल्यानंतर शैलेश लोढा यांचा निर्मात्यांवर निशाणा?
या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांची जागा सचिन श्रॉफने (Sachin Shroff) घेतली आहे. लोकप्रिय कलाकाराची बदली झाल्याने चाहत्यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही मालिका सध्या सोशल मीडियावर त्यातील नव्या कलाकारामुळे चर्चेत आहे. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांची जागा सचिन श्रॉफने (Sachin Shroff) घेतली आहे. लोकप्रिय कलाकाराची बदली झाल्याने चाहत्यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. काहींना मालिकेचा नवीन एपिसोड पसंत पडला नाही, तर काहींनी शैलेश यांना मालिकेत परत आणण्याची मागणी केली आहे. यादरम्यान आता शैलेश यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.
शैलेश हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक कविता लिहिली आहे. यामध्ये त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी निर्माते असित मोदी कुमार यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय.
शैलेश लोढा यांची पोस्ट-
एक ताजा व्यंग्य कविता मेरा ही चेहरा सब से बड़ा हो यार तुम कितने असुरक्षित और डरे हो परिभाषा तक नहीं जानते ईमान की इतनी बार अपना कहा बदलते हो कीमत तो पता ही नहीं ज़ुबान की अगर तुम में आत्मा होती तो पूछता क्या कभी उसे टटोला था वैसे एक सवाल ज़रूर है आखिरी बार तुमने सच कब बोला था? #शैलेशकीशैली
शैलेश यांच्या या कवितेवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तुमची कविचा वाचून असं वाटतंय की तुम्ही असित मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तारक मेहता.. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच शैलेश लोढा भूमिका साकारत आहेत. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
View this post on Instagram
शैलेश लोढा हे मालिकेच्या कराराबाबत खूश नव्हते. मालिकेच्या वेळापत्रकाशी संबंधित समस्या असल्याने त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातंय. निर्मात्यांनी त्यांना मालिकेत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम होते. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, अंजली भाभीची भूमिका साकारणारी नेहा मेहता यांनी निरोप घेतला.