शार्क से डिल पक्की; थिंकरबेल लॅब्सची दृष्टी देणाऱ्या अ‍ॅनीसाठी 1.5 कोटीची गुंतवणूक

यावेळीही एक अफलातून मित्रांची गँग या कार्यक्रमात सहभागी झाली. त्यांच्या कल्पनेतील जग वास्तवात आलेलं पाहायला माणसं असूसलेली आहेत. कारण त्यांच्या बिझनेसला एक दुःखाची आणि मायेची किनार आहे. अमन, दिलीप, संस्कृती आणि सैफ यांची मैत्री असली तरी त्यांचं काम आहे ते माणुसकीचं.

शार्क से डिल पक्की; थिंकरबेल लॅब्सची दृष्टी देणाऱ्या अ‍ॅनीसाठी 1.5 कोटीची गुंतवणूक
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 7:13 AM

मुंबईः भारतातील रिअ‍ॅलिटी शोची (Reality Show) संकल्पना दिवसेंदिवस बदलत आहे, टीव्ही मालिकांचे वेगवेगळे फंडे सुरु असतानाच शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India) हा शो सुरु झाल आणि प्रचंड लोकप्रिय (Popular) झाला. लोकप्रिय होण्यामागचं कारणही तसच आहे. व्यवसाय आणि पैशाच्या गणितावर चालणाऱ्या कार्यक्रमात लहान मोठे उद्योजक, व्यावसायिक काय करतात, त्यांचा व्यवसायाचा टर्न ओव्हर किती असतो, त्यांना निव्वळ फायदा होतो किती, त्यांच्या शाखा आहेत की नाहीत, ते भारतात आहेत की भारताबाहेरही त्यांचा बिझनेस आहे अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात भेटतात.

यावेळीही एक अफलातून मित्रांची गँग या कार्यक्रमात सहभागी झाली. त्यांच्या कल्पनेतील जग वास्तवात आलेलं पाहायला माणसं असूसलेली आहेत. कारण त्यांच्या बिझनेसला एक दुःखाची आणि मायेची किनार आहे. अमन, दिलीप, संस्कृती आणि सैफ यांची मैत्री असली तरी त्यांचं काम आहे ते माणुसकीचं. कारण त्यांच्या कल्पना जेव्हा त्यांनी टँकमधील शार्क्स समोर मांडल्या त्यावेळी त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भाव होते ते म्हणजे आपलाही हात यांच्या कामाला लागला पाहिजे म्हणून गुंतवणूकीचा विषय निघाला तेव्हा नमिता थाप्पर यांची टक्केवारी वाढतेही आणि कमीही होते, आणि मग शेवटी म्हणतात, मला हे काम करायचंच आहे.अन् मग सुरु होतो खर खेळ.

भारतात 20 लाखापेक्षा जास्त मुलं ही दृष्टीहीन

भारतात 20 लाखापेक्षा जास्त मुलं ही दृष्टीहीन आहेत, आणि त्यापेक्षा भयानक परिस्थिती ही अंधासाठी शिकवणाऱ्या शिक्षकांची आहे. ब्रेल लिपी शिकवणाऱ्या शिक्षकांची समस्या ही फक्त भारतातच आहे असं नाही तर ती जागतिक समस्या बनली आहे. त्यासाठी अमन, दिलीप, संस्कृती आणि सैफ या चौघांनी अ‍ॅनी हे सेल्फ लर्निंग रिमोट डिव्हाईस बनवले आहे. आणि त्यासाठीच ते शार्क टँक इंडियामध्ये त्यानी सहभागी झाले होते. त्यांनी तयार केलेले अ‍ॅनी नावाचे डिव्हाईस पाहून हे शार्क्सही त्यांच्यावर बेहद्द खूष झाले आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्या या कार्याला हातभार लावायचा आहे, अशीच भावना ही Thinkerbell Labs च्या अमन, दिलीप, संस्कृती आणि सैफबरोबर बोलताना होती.

WHO कडून मान्यता

Thinkerbell Labs म्हणजे WHO कडून मान्यता मिळवलेली आणि गौरवलेली एक संस्था. शार्क टँकमध्ये आल्यानंतर अनेक जण शार्कच्या प्रश्नामुळे घाबरगुंडी उडते आणि विश्वास डळमळीत होतो. पण Thinkerbell Labs च्या सदस्यांनी सुरुवातच इतकी भन्नाट केली या टँकमधील शार्क एकदम दयाळू आणि मायाळू झाले. कारणही तसच होतं कारण Thinkerbell Labs च्या सदस्यांनी जे अ‍ॅनी नावाचं दृष्टीहीन मुलांना शिकवणारं जे डिव्हाईस बनवलं आहे ते माणसाला नाही तर जगाला दृष्टी देणारं तंत्रज्ञान आहे. कारण हे जगातील पहिलं तंत्रज्ञान आहे जे स्वतः दृष्टीहीन मुलांना शिकवणार आहे.

अ‍ॅनी हे स्वतः दृष्टीहीन मुलांना शिकवणारे तंत्रज्ञान

अ‍ॅनी हे स्वतः दृष्टीहीन मुलांना शिकवणारे तंत्रज्ञान तर आहेच पण त्याच बरोबर यामध्ये महत्वाचं आहे ते तुम्ही ते ट्रॅक करु शकता. मुलांच्या आवडीचा अभ्यास घेऊ शकता आणि त्याही पुढे जाऊन ज्या नियमित शाळा आहेत त्या शाळेत हे डिव्हाईस तुम्ही घेतले तर तिथेही तुम्ही बिनधास्तपणे शिकू शकता.

टँकमधील शार्क्ससमोर सादरीकरण 

शार्क टँकमध्ये जेव्हा अमन, दिलीप, संस्कृती आणि सैफ येऊन थांबतात तेव्हा ते आपल्या Thinkerbell Labs विषयी बोलत राहतात. संस्कृतीच्या सादरीकरणातूनच Thinkerbell Labs ची सगळी पाश्वभूमी भारतातील आणि जगातील दृष्टीहिन लोकांची अवस्था अधोरेखित करते. संस्कृतीच आपल्या Thinkerbell Labs विषयी सांगणं सुरू असतं तेव्हा बरोबरचे आलेले अमन, दिलीप आणि सैफ तिच्या प्रत्येक गोष्टीला साथ देत राहतात, यातूनच त्यांच्यातील असलेली प्रामाणिक तळमळ दिसते. आणि ज्या वेळी त्यांच्या अ‍ॅनी बद्दल प्रथमेश सिन्हा प्रयोगासह टँकमधील शार्क्ससमोर सादरीकरण करतो तेव्हा तर शार्क्स टँकमधील डिल आता पक्कच होणार असं वाटू लागतं.

अमेरिकेतही त्यांचं 12 ते 13 कोटीचा करार

प्रथमेश सिन्ही सादरीकरणानंतरच शार्क्स टँकमधील जज असणारे सगळेच प्रभावित होतात मग खऱ्या अर्थाने त्यांचा Thinkerbell Labs च्या गुंतवणूकीसाठी प्रयत्न सुरू होतो. तो प्रवासच खरं तर भन्नाट आहे कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाला हेच वाटतं की हे डिल पक्क् झालं पाहिजे. त्यानंतर अ‍ॅनीचा जगातील प्रवास कसा सुरू आहे, अ‍ॅनीसाठी कोण कोण पुढं आलं, आंतरराष्ट्रीय बाझारा त्याची किंमत काय आहे आणि शार्क्स टँकमधील शार्क्सनी गुंतवणूक केली तर टक्केवारी काय ठरणार याचा खेळ सुरू होतो. गुंतवणूकीच्या या खेळाला एक मायेची आणि प्रेमाची झालर आहे. कारण दृष्टीहिन माणसांसाठी नवी दृष्टी द्यायची आहे. म्हणून Thinkerbell Labs साठी आनंद महिंद्रा आणि रमन रॉय हेही पुढे आले आहेत. अमेरिकेतही त्यांचं 12 ते 13 कोटीचा करार आहे, आणि अमेरिकेत याचं नाव पॉली असं आहे.

एका टक्क्यांपासून गुंतवणूक

पीयुष बन्सल, नमिता थापर , अनुपम मित्तल , गझल अलग आणि अमन गुप्ता या शार्क्सबरोबर डिल करायच्या गोष्टी येतात तेव्हा टँकमधील खरा खेळ सुरू होतो. कोटीचे व्यवहार असले तरी एक टक्क्यापासून ते अगदी पाच आणि चार टक्क्यांच्या गुंतवणूकीवर चर्चा होते. ज्यावेळी त्यांच्या Thinkerbell Labsचे मुल्यांकन होते 1.5 कोटी आणि गुंतवणूकीची टक्केवारी ठरते ती ३ टक्के आणि Thinkerbell Labs चे शार्क्सबरोबर डिल पक्के होते.

संबंधित बातम्या

केवळ मनोरंजनच नाही तर व्यवसायाच्या नव्या कल्पनाही! ‘शार्क टॅंक इंडिया …

Shark Tank India कार्यक्रमातील Ice cream व्यावसायिकाची कमाई बघा, आकडा ऐकून घाम फुटेल

दीपिकाचा ‘गहराइयां’ कंगनाला पोर्नोग्राफीसारखा का वाटतो?, म्हणून आता कंगानाच्या निशाण्यावर दीपिका…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.