Shark Tank India कार्यक्रमातील Ice cream व्यावसायिकाची कमाई बघा, आकडा ऐकून घाम फुटेल

गौरव गोयल जेव्हा या कार्यक्रमात 300 कोटीचा आकडा सांगतात, तेव्हा सगळेच जण आवाक होतात. त्यानंतर हा आकडा ऐकून व्यवसायाबद्दल त्याला विचारतात तेव्हा तो म्हणतो की, दिल्लीत जरी गोपाळ 56 ची उत्पादनं मिळत असली तरी आमचं एक दुकान कॅलिफोर्नियामध्ये आहे.

Shark Tank India कार्यक्रमातील Ice cream व्यावसायिकाची कमाई बघा, आकडा ऐकून घाम फुटेल
शार्क टँक इंडिया
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 10:32 AM

मुंबईः Shark Tank India ही SET India वर प्रसारित होणारी एक भारतीय व्यावसायिक रिअॅलिटी (Reality) टीव्ही मालिका (Serial) आहे. हा शो शार्क टँक या अमेरिकन (American) शोची भारतीय फ्रेंचाइजी आहे. यामध्ये, भारतातील इच्छुक उद्योजक आणि त्यांचे व्यवसाय, मॉडेल गुंतवणूकदारांच्या पॅनेलसमोर सादर करतात आणि त्यांना त्यांच्या कल्पनेत पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करतात. शार्क टँक इंडियाचा हा पहिला सीझन आहे. या सीझनमध्ये सहभागी झालेले व्यावसायिक आणि त्यांचा असलेला व्यवसाय आणि गुंतवणूकीसाठी कार्यक्रमात असलेल्या जज लोकांना पटवून देताना त्यांच्या रक्कम ऐकून बघणाऱ्याला घाम फुटतो.

या कार्यक्रमात एक दिल्लीचा व्यावसायिक या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. त्याचा व्यवसाय आहे आईस्क्रीम बनवण्याचा पण त्यानं कार्यक्रमातील जज लोकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यानं मागणी केली आहे ती 300 कोटीची. या मागणीनंतरच हा कार्यक्रम बघण्यात खरी मज्जा येते. आणि या कार्यक्रमात जज अर्थात परीक्षक म्हणून काम पाहत आहेत, पियूष बन्सल, गजल अलग अन्सीर ग्रोव्हर, अमन गुप्ता, नमिता थाप्पर ही वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज माणसं.

300 कोटीची अपेक्षा

Shark Tank India च्या या सीझनमध्ये 38 वर्षाचा असलेला गौरव गोयल एक व्यावसायिक म्हणून सहभागी झाला आहे. सध्या कडाक्याची थंडी नसली तरी वेगवेगळ्या भागात थंडी अजून बाकी आहे, तरीही आईस्क्रीमचा व्यवसाय असणाऱ्या गौरव गोयलने परीक्षकानाच आपल्या कंपनीतील आईस्क्रीम खाऊ घातले आहे. चर्णमृत असलेलं आईस्क्रीम परीक्षकांना खाऊ घालतानाच त्याला परीक्षक विचारतात की, तू काय करतोस आणि तुझा व्यवसाय काय आहे, आणि तुला किती पैशाची गरज आहे. त्यानंतर आईस्क्रीमचा व्यवसाय असणारा गौरव म्हणतो की, 300 कोटीची अपेक्षा आहे.

1913 पासून आईस्क्रीम हा व्यवसाय

परीक्षकांना ही रक्कम अवाढव्या वाटत नसली तरी तुला कशासाठी आणि एवढी रक्कम का Shark Tank India कार्यक्रमातील परीक्षक जेव्हा गौरवला अनेक प्रश्नांनी बंडावून सोडतात तेव्हा तो ही आपला व्यवसाय कसा वाढला आणि भविष्यात त्याचे काय काय योजना आहेत, हे तो परीक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. गौरव आपल्या वडिलानी गोपाल 56 हा आईस्क्रीम कसा बनवला हे सांगताना तो म्हणतो 1913 साली लाकडाच्या पेटीपासून सुरुवात करुन नंतर आपल्याकडे 92 पेक्षा जास्त आईस्क्रीमचे प्रकार कसे मिळू लागले हे सांगतो. गौरवने कार्यक्रमात आल्या आल्या सांगितले की, मला 300 कोटीची गरज आहेत, त्यानंतर कार्यक्रमातील सगळ्या जज लोकांच्या प्रश्नांचे फायरिंग चालू होते. एवढे पैसे तुला कशासाठी आणि का लागणार असं विचारल्यावर गौरव म्हणतो की, एक तर मला व्यवसाय पुन्हा नव्याने उभा करायचा आहे, आणि आईस्क्रीमचा नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी 5 ते 7 कोटी खर्च येणार म्हणूनही सांगतो मग या त्याच्या उत्तरावर नमिता थाप्पर शंका उपस्थित करुन म्हणते तुझं जे उत्पादन आहे ते तज्ज्ञांकडून तपासून झालं का म्हटल्यावर तो नाही म्हणून सांगतो. मग आम्ही तुझ्या व्यवसायात का गुंतवणूक करायची असा सवालही ती विचारते.

आमचं उत्पादन सगळ्या जगात पोहचवायचं

गौरव गोयल जेव्हा या कार्यक्रमात 300 कोटीचा आकडा सांगतात, तेव्हा सगळेच जण आवाक होतात. त्यानंतर हा आकडा ऐकून व्यवसायाबद्दल त्याला विचारतात तेव्हा तो म्हणतो की, दिल्लीत जरी गोपाळ 56 ची उत्पादनं मिळत असली तरी आमचं एक दुकान कॅलिफोर्नियामध्ये आहे. आणि तिथं जसं आईस्क्रीमचं दुकान आहे त्याच धर्तीवर मला आमचं उत्पादन सगळ्या जगात पोहचवायचं आहे. आणि त्याला परीक्षक हेही सांगतात की, सपने हमेशा आसामान में होना चाहिए लेकिन पाँव जमीन पर होना चाहिए.

निव्वळ नफा 80 लाखाचा

गौरव गोयलचा वर्षाला तीन ते चार कोटीचा व्यवसाय होतो आणि त्यातील निव्वळ नफा त्याला मिळतो तो 80 लाखाचा. या व्यवसायात तुझा कोण गुरू आहे का असं विचारताच तो म्हणतो आहे, मात्र मी त्यांचं नाव सांगू इच्छित नाही असं म्हणतो आणि माझा जो गुरु आहे तो डेअरी टेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ असल्याचंही तो सांगतो. यामधील परीक्षकांची जसे प्रश्न ऐकण्यासारख्या आहेत तसेच त्यांचे काही प्रश्नही भन्नाट आहेत. गौरव म्हणतो की, मला देश विदेशात माझा व्यवसाय वाढवायचा आहे. त्यावर जद म्हणतात की, 300 कोटी घेऊन तुम्ही व्यवसायातून निवृत्त होणार का मग आणि तीनशे कोटी सगळेच या बिझनेसमध्ये गुंतवले गेले तर मग देशातील सगळ्यानाच सक्तीनेच आईस्क्रीम खावू घालावे लागेल. या सगळ्या पैश्याच्या व्यवहारात त्याचं त्याच्या व्यवसायातील ज्ञान, त्याचे भविष्यातील प्रोजेक्ट आणि आपल्या व्यवसायातील भान याचंही त्यांनी चाणक्षपणे परीक्षा घेतात, कारण सगळे जज लोकं वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.Shark Tank India हा कार्यक्रम बघण्यात मज्जा येते कारण पैश्यांचा हिशोब मागितला जातो आणि तो सरळ देताही येत नाही.

संबंधित बातम्या

कच्चा बादामवरचे ठुमके तर बघा; भोजपुरी अभिनेत्री आम्रपालीचा इन्स्टावरचा व्हिडिओ व्हायरल

माझं जर चुकत असेल तर बरोबर करा म्हणत कंगनाला शबाना आझमीनी दिलं उत्तर…

Madhuri Dixit Photos : माधुरी दिक्षितचे फोटो पाहून तुमचंही मन धकधक करायला लागेल, फोटो एकदा बघाच…

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.