सैफ-अमृताच्या घटस्फोटाविषयी पहिल्यांदाच व्यक्त झाल्या शर्मिला टागोर; प्रत्येकजण दुखावला..

सैफ अली खानने ऑक्टोबर 1991 मध्ये अमृताशी लग्न केलं होतं. 2004 मध्ये हे दोघं विभक्त झाले. तेव्हापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन्ही मुलं अमृतासोबतच राहतात. त्यानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये सैफने करीना कपूरशी लग्न केलं. सैफ आणि करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत.

सैफ-अमृताच्या घटस्फोटाविषयी पहिल्यांदाच व्यक्त झाल्या शर्मिला टागोर; प्रत्येकजण दुखावला..
शर्मिला टागोर, सैफ अली खान-अमृता सिंगImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 9:32 AM

मुंबई : 28 डिसेंबर 2023 | ‘कॉफी विथ करण 8’च्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेता सैफ अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. या एपिसोडमध्ये सैफ आणि शर्मिला हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. त्याचवेळी सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटाचा विषय निघाला. संपूर्ण कुटुंबासाठी ती वेळ चांगली नव्हती, असं शर्मिला यावेळी म्हणाल्या. अमृतासोबतच सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन्ही मुलांचीही साथ गमावल्याचं दु:ख त्यावेळी सहन केल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सैफसुद्धा अमृतासोबतचं लग्न आणि घटस्फोट या दोन्ही विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाला.

सैफने सांगितलं ती शर्मिला टागोर या मुंबईत त्याला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि त्याचवेळी सैफने त्यांना अमृतासोबतच्या लग्नबद्दल सांगितलं. त्याच्या एक दिवस आधीच सैफ आणि अमृता यांनी लग्न केलं होतं. शर्मिला यांचा सैफ-अमृताच्या लग्नाला स्पष्ट नकार होता. “आईच्या डोळ्यात त्यावेळी पाणी होतं आणि ती रडू लागली होती. तू मला खरंच दुखावलंस असं ती म्हणाली”, असं सैफने सांगितलं. त्यावर शर्मिला यांनीसुद्धा स्पष्ट केलं की ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्यांना आयुष्यातील प्रत्येक मोठी गोष्ट सांगणं चांगली गोष्ट असते.

हे सुद्धा वाचा

सैफने जेव्हा अमृताला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मात्र सर्वांत आधी त्याने आई शर्मिलालाच सांगितलं होतं. “विभक्त होण्याआधी मी सर्वांत आधी आईला फोन केला होता. तिला घटस्फोटाविषयी सांगितलं होतं. त्यावेळी तिने दीर्घ श्वास घेतला आणि काही क्षण ती नि:शब्द होती. त्यानंतर ती मला म्हणाली की जर तुला हेच हवं असेल तर मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे माझी खूप मदत झाली”, असं सैफने सांगितलं.

अमृतासोबतच्या घटस्फोटाविषयी शर्मिला पुढे म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही इतकी वर्षे एकत्र राहता आणि तुम्हाला इतकी गोंडस मुलं असतात, तेव्हा कोणतंच ब्रेकअप सोपं नसतं. त्यामुळे सुसंवादाने सगळं झालं होतं, अशी गोष्ट नाही. त्या टप्प्यावर सुसंवाद साधणं किती कठीण असतं हे मला माहीत आहे. प्रत्येकजण दुखावला गेला होता. त्यामुळे आयुष्यातील तो टप्पा चांगला नव्हता. पण मी माझे प्रयत्न केले. अमृताला शांत होण्याची गरज होती.”

“हा फक्त एकमेकांपासून वेगळं राहण्याबद्दलचा प्रश्न नव्हता. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी समाविष्ट होत्या. ती वेळ आमच्यासाठी अजिबात चांगली नव्हती. कारण त्यावेळी इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आम्हाला लहान मुलांची खूप आवड होती. खासकरून टायगर आणि इब्राहिमची फार जवळीक होती. त्यामुळे त्यांनाही इब्राहिमसोबत पुरेसा वेळ मिळाला नाही. अमृता आणि तिच्यासोबत दोन्ही मुलांची साथ गमावणं, आमच्यासाठी दुपटीने त्रासदायक होतं”, असं त्या पुढे म्हणाल्या.

सारा आणि इब्राहिम हे वाढदिवस, सण किंवा इतर पार्ट्यांच्या वेळी सैफच्या कुटुंबासोबत एकत्र येतात. या दोघांना तैमुर-जेहसोबत वेळ घालवताना अनेकदा पाहिलं गेलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.