Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूच्या मैत्रिणींसमोरच करीना सैफसोबतच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल बोलून गेली अन्..

सैफ अली खान आणि करीना कपूर हे लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. तेव्हाचा किस्सा शर्मिला टागोर यांनी कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितला. त्याचसोबत सून करीनाचा स्वभाव कसा आहे, याविषयीही त्या मोकळेपणे व्यक्त झाल्या.

सासूच्या मैत्रिणींसमोरच करीना सैफसोबतच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल बोलून गेली अन्..
Sharmila Tagore and Kareena KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 2:02 PM

मुंबई : 28 डिसेंबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोच्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेता सैफ अली खानने आई शर्मिला टागोरसोबत हजेरी लावली. यावेळी तिघांनी चित्रपट आणि कुटुंबाविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. या शोदरम्यान सैफची पूर्व पत्नी अमृता सिंग आणि आताची पत्नी करीना कपूर या दोघींचाही विषय चर्चेत आला. करण जोहरने शर्मिलाला विचारलं, “सैफ-करीनाच्या लग्नाविषयी तुम्हाला काय वाटलं होतं? कारण करीनासुद्धा अभिनेत्री आहे. तुम्ही आधीच सैफच्या पहिल्या पत्नीमध्ये भावनिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे करीनासोबत जुळवून घेताना कसं वाटलं, कोणत्या अडचणी आल्या?”

करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना शर्मिला म्हणाल्या, “मी करीनाला आधीपासून ओळखायचे. म्हणजे मी तिला तिच्या लग्नाआधी भेटले होते आणि ती माझ्याशी खूप चांगल्याप्रकारे वागली होती. ती खरंच खूप चांगली आहे आणि ती जशी आहे तशीच वागते. जेव्हा टायगर आजारी होते, तेव्हा ती आमच्यासोबत होती. जेव्हा त्यांचं निधन झालं, तेव्हासुद्धा ती आमच्यासोबत होती.”

हे सुद्धा वाचा

सैफ आणि करीना हे लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याविषयी जेव्हा शर्मिला यांना समजलं तेव्हा नेमकं काय घडलं, याविषयीची खुलासा त्यांनी शोमध्ये केला. त्या पुढे म्हणाल्या, “एके दिवशी माझ्या घरी दिल्लीहून बऱ्याच मित्रमैत्रिणी आल्या होत्या. त्यावेळी सैफ आणि करीनासुद्धा तिथे होते. मी करीनाला सहज विचारलं की, काय चाललंय? त्यावर ती पटकन म्हणाली, सकाळी उठल्यानंतर सैफने मला हे सांगितलं होतं. ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहतायत, हे त्यातून स्पष्टच झालं होतं. माझ्या वयाच्या मित्रमैत्रिणींसमोर ती हे पटकन अगदी सहजरित्या बोलून गेली होती. आजही मला ती घटना आठवली की हसायला येतं. ती खूप साधी आणि सरळ आहे. जे तिच्या मनात असतं, तेच ती बोलते.”

“..आणि ती नेहमी जेवणाचं टेबल खूप सुंदररित्या सजवते. त्यानंतर ती मला विचारते, अम्मा तुम्हाला हे खायला आवडेल का? तुम्हाला ते खायला आवडेल का? त्यामुळे आमच्यात चांगली बाँडिग झाली. तिला डिनर नेहमी वेळेवर करायला आवडतं. त्यामुळे सर्वकाही खूप छान आहे. आयुष्याच्या बाबतीत खूप स्पष्टता आहे”, अशा शब्दांत त्यांनी करीनाचं कौतुक केलं.

या शोदरम्यान करीना कपूरचीही एक क्लिप दाखवण्यात आली होती. त्यात ती सासू शर्मिला टागोर यांच्याविषयी बोलताना दिसली. “मी सैफला भेटल्यापासूनच त्यांना अम्मा म्हणून हाक मारू लागले. कारण त्यांच्यासोबत ते कनेक्शन सहज जुळलं होतं. त्या खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या आहेत. त्या माझ्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून पाहतात. सोहा आणि सबा यांच्यासारखीच मी त्यांची मुलगी आहे, असं त्या वागतात. त्यामुळे मला कधीच परकेपणा जाणवला नाही”, असं ती म्हणाली.

'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.