Shatrughan Sinha यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर, सोनाक्षीचं नाव घेत म्हणाले…

Shatrughan Sinha Health : सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात करण्यात आलं दाखल, आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर, लेकीचं नाव घेत केला मोठा खुलासा..., गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त सिन्हा कुटुंबियांची चर्चा...

Shatrughan Sinha यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर, सोनाक्षीचं नाव घेत म्हणाले...
Shatrughan Sinha
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 8:05 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल याच्या लग्नानंतर दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे चाहते देखील चिंता व्यक्त करताना दिसले. अशात शत्रुघ्न सिन्हा यांना का रुग्णालयात दाखल करण्यात आलं? याची अचूक माहिती देखील समोर येत नव्हती. सर्वत्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरु होत्या. आता यावर स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठी माहिती दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतःच्या प्रकृतीचा मोठा खुलासा करत सोनाक्षी हिच्या लग्नाबद्दल देखील मोठी वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आलं की, तुम्ही सोफ्यावरून पडल्याची माहिती समोर आली होती? यावर अभिनेते म्हणाले, ‘मी सांगेल की लता दीदींचं एक गाणं होतं मैं सोफे से गिर पडी… हा विनोदाचा भाग झाला. पण माझ्याकडे सोफ्यावर लोळण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सोफ्यावरून पडण्याचा प्रश्नच नाही…’ दरम्यान, तुमच्याबद्दल अशा अफवा कोण पसरवत आहे? असा प्रश्न देखील शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आला.

यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाला, ‘असं कोण करत आहे मला माहिती आहे. पण ती व्यक्ती माझ्याबद्दल वाईट विचार करत नाही म्हणून जाऊद्या… मी असं देखील ऐकलं आहे की, माझी सर्जरी झाली आहे आणि मलाच माहिती नाही..’ पुढे शत्रुघ्न सिन्हा यांनी रुग्णालयात दाखल होण्याचं कारण देखील विचारण्यात आलं.

स्वतःच्या प्रकृतीची माहिती देत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मी तर सांगेल ज्यांचं वय 60 च्या पुढे आहे त्यांनी सर्वांनी चेकअप करुन घ्यायला हवं. आधी निवडणुकांमुळे कामात होतो. त्यानंतर मुलीचं लग्न… आता मी तरुण राहिलेलो नाही. एका दिसात तीन शिफ्ट करु आणि त्यानंतर रात्री पार्टी करू…’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

सोनाक्षीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मुलीचं लग्न झालं म्हणून मी आनंदी आहे. देवाच्या कृपेने माझी मुलली आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. तिच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे. जी लोकं आनंदी नाहीत, त्यांच्यासाठी माझ्याकडे बोलण्यासाठी काहीही नाही..’ सध्या सर्वत्र सिन्हा कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.