एक्स-गर्लफ्रेंडच्या हत्येप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला दिलासा नाहीच; वाढणार अडचणी

एक्स-गर्लफ्रेंडने वयाच्या 21 व्या वर्षी संपवलं स्वतःचं आयुष्य... हत्येप्रकरणी 'या' अभिनेत्याला दिलासा नाहीच..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा, एक्स-गर्लफ्रेंडच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांमुळे अभिनेता अडकला वादाच्या भोवऱ्यात

एक्स-गर्लफ्रेंडच्या हत्येप्रकरणी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला दिलासा नाहीच; वाढणार अडचणी
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 12:07 PM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री तुनिषा शर्मा.. गेल्या वर्षी अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शुटिंगच्या सेटवर स्वतःला संपवलं होतं. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या आईने लेकीचा एक्स-बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खान याच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे अभिनेत्याला अटक देखील झाली होती. पण काही दिवसांनंतर अभिनेत्याला जामीन मंजूर झाला. पण अता अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.

तुनिषा शर्मा हत्येप्रकरणी सध्या सुनावणी सुरु आहे. तुनिषा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा शिझान याच्यावर आहे. पण नुकताच झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने अभिनेत्यावर असलेला गुन्हा रद्द करण्यास नकार देण्यात आला आहे. अभिनेत्याला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नसल्याची माहिती समोर येत आहे.

तुनिषा शर्मा हिने संपवलं स्वतःचं आयुष्य

24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषा हिने पालघर जवळील एका स्टुडिओत शुटिंग दरम्यानच स्वतःचं संपवलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. लेकीच्या निधनानंतर आई वनिता शर्मा यांनी शिझान याच्यावर गंभीर आरोप केले होते. वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीजान खानला अटक केली.

हे सुद्धा वाचा

तुनिशा मुंबईत तिच्या आईसोबत राहत होती. शीजान आणि तुनिशाचे प्रेमसंबंध होते. शीजानच्या त्रासामुळेच तुनिशाने आत्महत्या केली आहे, असा आरोप वनिता शर्मा यांनी केला आहे. शिझान याला अटक झाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी देखील तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले.

शिझान याला झाला होता जामीन मंजूर

शिझान खान जवळपास 70 दिवस तुरुंगात होता. तुनीषा प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याचा जामीन मंजूर झाला. 5 मार्च रोजी शिझान याची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती देखील समोर आली होती.

शिझान याला जामीन मंजूर झाला असला तरी त्याच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिझान खान याची चर्चा रंगत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.