विमानात घाबरलेल्या महिलेचा अनिल कपूर यांनी धरला हात; त्यानंतर…

विमानात घाबरलेल्या महिलेसोबत अनिल कपूर यांनी असं काय केलं? ज्यामुळे ती महिला थेट पोस्ट करत म्हणाली, 'ते दोन तास माझ्यासाठी....', महिलेची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण

विमानात घाबरलेल्या महिलेचा अनिल कपूर यांनी धरला हात; त्यानंतर...
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 7:59 AM

मुंबई : बॉलिवूड स्टार कायम त्यांच्या खास अंदाजामुळे चर्चेत असतात. आता अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी देखील विमानात घाबरलेल्या महिलेला आधार दिला आणि चक्क दोन तास त्या महिलेसोबत गप्पा मारल्या. अनिक कपूर यांच्यासोबत दोन तास प्रवास केल्यानंतर महिलेला आलेला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. अनिल कपूर यांच्यासोबत दोन तास प्रवास केलेल्या महिलेचं नाव शिखा असं आहे. दोन तासांचा आपला प्रवास नेमका कसा झाला? याबद्दल शिखा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय प्रवासादरम्यान अनिल कपूर यांच्यासोबत काढलेला सेल्फी देखील पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र शिखा यांच्या पोस्टची चर्चा आहे.

अनिल कपूर यांच्यासोबत कसा झाला शिखा यांचा विमान प्रवास ? बे. आर्टी (Be Artsy) या संस्थापक शिखा मित्तल यांनी LinkedIn वर पोस्ट लिहून अनिल कपूर यांनी दिलेल्या आधाराबद्दल आभार मानले आहेत. शिखा पोस्टमध्ये म्हणाल्या, ‘विमानाने टेकऑफ केलं आणि टर्ब्युलन्स सुरू झाल्याने लगेज बॉक्स उघडला त्यानंतर आवाज होवू लागला. यामुळे पूर्ण घाबरली होती. पण माझ्या शेजारी बसलेल्या अनिल कपूर यांनी माझा हात धरला आणि माझी भीती घालवली.’

शिखा मित्तल पुढे म्हणाल्या, ‘माझा हात धरल्यानंतर ते बोलत राहिले. बोलण्यामध्ये अनिल कपूर यांनी माझं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. विमान टेक ऑफ करत असताना मला भीती वाटते. पण टर्ब्युलन्स सुरू झाल्याने मला आणखी भीती वाटली. तेव्हा माझ्या सहप्रवाशाने माझा हात पकडला आणि काहीही होणार नाही असं मला सांगितलं. घाबरल्यानंतर माझा हात धरणारे अनिल कपूर होते.’

‘विमान प्रवास सुरु झाल्यानंतर आमच्या अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. अनिल कपूर यांच्यासोबत घालवलेले ते दोन तास मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी माझ्या कामाचं स्वरुप विचारलं. आर्थिक योजना, रिटायर्डमेंट प्लान, निधी ठेवी, वारस निवडणं या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही चर्चा केली…’

अनिल कपूर यांनी देखील शिखा यांना सिनेविश्वातील अनेक गोष्टी सांगितल्या, ‘लम्हे सिनेमाबद्दल आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर अनिल कपूर यांनी श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करताना अलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं. त्यांच्यामुळे विमान प्रवासात माझी भीती कमी झाली. कोविडमुळे माझ्या मनात एक वेगळी भीती निर्माण झाली आहे… ‘ असं देखील शिखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.