Shilpa Shetty : ‘कोरोना प्यार हैं…’, कोरोना पॉझिटिव्ह शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी व्यक्त केलं प्रेम

शिल्पा शेट्टीनं राज कुंद्रासोबत स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. (Shilpa Shetty: ‘Corona Pyaar Hain…’, Corona Positive Shilpa Shetty and Raj Kundra express love)

Shilpa Shetty : ‘कोरोना प्यार हैं…’, कोरोना पॉझिटिव्ह शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी व्यक्त केलं प्रेम
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 5:50 PM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या घरात क्वारंटाइन (Home Quarantine) आहे. सध्या शिल्पाच्या घरात कोरोनानं कहर केला आहे. शिल्पा शेट्टीनं स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. त्यानंतर आज तिनं एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत तिनं आपण नवऱ्याला किती मिस करतोय हे सांगितलं आहे. कोरोनाचा कहर आता बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शिल्पा शेट्टीनं सांगितलं की तिची सासू तिच्या घरी कोरोना पॉझिटिव्ह येताच त्यानंतर समीषा, विवान आणि तिची आई कोरोना चाचणी सकारात्मक आली.

पाहा फोटो

आता तिनं राज कुंद्रासोबत स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती काचाजवळ उभी आहे. त्या काचेच्या दुसर्‍या बाजूला राज उभा आहे, दोघंही प्रेमळ डोळ्यांनी एकमेकांकडे पाहात आहेत. राज कुंद्रा आणि शिल्पाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना शिल्पा शेट्टीनं ‘कोरोना दरम्यान प्रेमाची वेळ !!’ या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘कोरोना प्यार हैं… सर्वांचे आभार.’

शिल्पाच्या या नवीन पोस्टवरून असं दिसून आलं आहे की, तिचा पती कोरोनातून आता बरा झाला आहे, त्यामुळे तिनं सर्वांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ती टेन्शनमध्ये होती. कारण तिच्या मुलांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिल्पा तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. ती सर्वांची काळजी घेते. मात्र आता ही बातमी आल्यानंतर शिल्पाच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला असावा.

शिल्पा शेट्टीच्या आधी कार्तिक आर्यन, अक्षय कुमार, आमिर खान, भूमी पेडणेकर यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपट आणि मालिकांचं शूटींग थांबवण्यात आलं आहे. ज्यामुळे शूटिंगवरही मोठा परिणाम झाला आहे.

संबंधित बातम्या

Aaliyah Kashyap: डेटिंगपासून ते मद्यसेवनापर्यंत सर्व काही आई-बाबांना सांगते; आलियाचे बिनधास्त बोल

Photo : ‘कुर्ता पजामा काला काला…’, हीना खानचं नवं फोटोशूट

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.