सिद्धार्थ शुक्ला – शिल्पा शिंदे यांची ‘अधुरी प्रेम कहाणी’, ब्रेकअपनंतर अभिनेत्यावर गंभीर आरोप ?
सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पा शिंदे हिने अभिनेत्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सोडलं मौन; सिद्धार्थवर गंभीर आरोप करत म्हणाली...
मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) तिच्या कामामुळे कमी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शिल्पा शिंदे कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. शिल्पा शिंदे हिचं अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शिल्पा रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर सिद्धार्थ जेव्हा बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता झाला, तेव्हा अभिनेत्रीने सिद्धार्थ याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मौन सोडलं. एका वाईट रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत शिल्पाने सिद्धार्थ याच्यावर गंभीर आरोप केले.
एका मुलाखतीत शिल्पाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. २०११ पासून शिल्पा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. रिलेशनशिपमध्ये असताना शिल्पा आणि सिद्धार्थ यांना कधी एकत्र स्पॉट करण्यात आलं नाही. शिवाय सिद्धार्थ रिलेशनशिपबद्दल प्रचंड गंभीर असल्याचं देखील शिल्पाने मुलाखतीत सांगितलं. एवढंच नाहीतर, सिद्धार्थ याला लहान-लहान गोष्टीचा राग यायचा.
सिद्धार्थसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, एकदा चालत्या कारमध्ये सिद्धार्थ याला राग आला. शिवाय अभिनेत्याने कारमधून ठकलल्याचे आरोप देखील शिल्पाने केले. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला बिग बॉस विजेता घोषित करणं योग्य आहे? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला. ज्यामुळे सिद्धार्थ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
शिल्पाने केलेल्या आरोपांवर सिद्धार्थने स्पष्टीकरण दिलं होतं. शिल्पासोबत माझे काहीही संबंध नव्हते, असं म्हणत सिद्धार्थ संतापला होता. शिल्पाने सिद्धार्थवर मारहाणीचे देखील आरोप लावले. ब्रेकअपमुळे सिद्धार्थने मारहाण केल्याचं स्पष्टीकरण शिल्पाने एका मुलाखतीत दिलं. ज्यामुळे सिद्धार्थ आणि शिल्पा प्रचंड चर्चेत आले.
दरम्यान, बिग बॉस 13 नंतर सिद्धार्थ याचं नाव अभिनेत्री शहनाज गिल हिच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण अभिनेत्यांच्या निधानानंतर शहनाज हिच्यासह चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज सिद्धार्थ जिवंत नसला तरी, चाहत्यांच्या मनात अभिनेत्याच्या आठवणी आजही जिवंत आहे.
सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज कोलमडली होती. आता देखील शहनाज स्वतःला सावरताना दिसते. बिग बॉस 13 मधील सिद्धार्थ – शहनाज यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. आजही सोशल मीडियावर बिग बॉस 13 मधील दोघांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज अभिनेता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमात दिसणार आहे.