थेट शाहरुख खान याच्या जवान चित्रपटामुळे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्यामध्ये मोठा वाद, चाहतेही हैराण
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही कायमच चर्चेत असणारी जोडी आहे. दीपिका कक्कर हिने काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिलाय. आता दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळाला. या वादाचे कारणही तेवढेच मोठे आहे.
मुंबई : दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) यांनी टीव्ही मालिकांमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर या लग्नाला दीपिका कक्कर हिच्या घरच्यांनी विरोध देखील केला. दीपिका कक्कर (Dipika Kakar) हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म देखील स्वीकारला. गेल्या काही वर्षांपासून दीपिका कक्कर ही टीव्ही मालिकांपासून दूर आहे.
असे असतानाही दीपिका कक्कर ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायच असते. दीपिका कक्कर ही आपल्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, याची माहिती आपल्या चाहत्यांना ब्लाॅगच्या माध्यमातून देताना कायमच दिसते. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका कक्कर हिने काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला आहे.
दीपिका कक्कर हिला मुलगा झालाय. नुकताच शाहरूख खान याच्या जवान चित्रपटामुळे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळत आहे. दीपिका कक्कर हिला सोडून शोएब इब्राहिम हा जवान चित्रपट पाहण्याचा प्लॅन करतो. हे दीपिका कक्कर हिला कळाल्यानंतर तिचा पारा चांगलाच चढल्याचे दिसत आहे.
दीपिका कक्कर यामुळे शोएब इब्राहिम याच्यावर नाराज होते. दीपिका कक्कर म्हणते की, ठिक आहे तुम्ही मला सोडून जात आहेत ना? मग मी ही बाळाला घेऊन एकटीच दुबई फिरण्यासाठी जाईल. मात्र, दीपिका कक्कर हिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शोएब इब्राहिम हा जवान चित्रपट बघण्यासाठी गेल्याचे ब्लाॅगमध्ये स्पष्ट दिसत आहे.
यानंतर घरी आल्यावर शोएब इब्राहिम हा दीपिका कक्कर हिची माफी मागताना देखील दिसतोय. इतकेच नाही तर थिएटरमध्ये मी तुला खूप मीस केल्याचे सांगताना देखील शोएब इब्राहिम हा दिसत आहे. शाहरूख खान याच्यामुळेच दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्यामध्ये वाद झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे.
शाहरुख खान याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. शाहरुख खान याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट देखील शाहरुख खान याचा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.