AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस तळपदे-गौरी इंगवलेची निरागस प्रेमकथा; ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद

आजारपणानंतर अभिनेता श्रेयस तळपदे दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये श्रेयस आणि गौरी इंगवले ही नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

श्रेयस तळपदे-गौरी इंगवलेची निरागस प्रेमकथा; ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद
Shreyas Talpade, Gauri Ingwale Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 8:43 AM

मुंबई : 13 फेब्रुवारी 2024 | ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘ही अनोखी गाठ’ असं या चित्रपटाचं नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचं असून यात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणाले, “नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्य्नाच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील.”

हे सुद्धा वाचा

‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाविषयी श्रेयस तळपदे म्हणाला, ”सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अशावेळी महेश दादांनी मला ‘ही अनोखी गाठ’ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीच मी ठरवले हा चित्रपट करायचाच. मुळात महेश सर खूप निवडक सिनेमे करतात, त्यातही त्यांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. महेश दादा आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव मस्तच होता. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल.”

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणाले, “महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच चांगला असतो. त्यांच्या कथेत प्रचंड पकड असते, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. नात्यांची हळवी बाजू अलगद प्रेक्षकांसमोर मांडण्याची त्यांची खासियत त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. ‘ही अनोखी गाठ’ ही सुद्धा नात्याची अशीच एक तरल भावना आहे, जी प्रेक्षकांना आवडेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो हसवेल, भावनिक करेल, नात्यांचे महत्वही अधोरेखित करेल.”

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.