‘क्लिनिकली, मी मृतावस्थेत होतो’; कार्डिॲक अरेस्टनंतर श्रेयस तळपदेची पहिली मुलाखत

गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अँजियोप्लास्टी झाल्यानंतर त्याला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. सध्या श्रेयस त्याच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष देत असून घरीच आराम करत आहे. घडलेल्या घटनेविषयी त्याने नुकतीच एक मुलाखतसुद्धा दिली आहे.

'क्लिनिकली, मी मृतावस्थेत होतो'; कार्डिॲक अरेस्टनंतर श्रेयस तळपदेची पहिली मुलाखत
Shreyas Talpade
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 2:04 PM

मुंबई : 3 जानेवारी 2024 | गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर तातडीने त्याला अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. जवळपास सहा-सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द श्रेयसने तो सर्व अनुभव सांगितला. “मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच रुग्णालयात दाखल झालो नव्हतो. कधीच कोणतं फ्रॅक्चरसुद्धा झालं नव्हतं. त्यामुळे असं काही होईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुमच्या आरोग्याला अजिबात गृहित धरू नका. जान है तो जहान है”, असं त्याने म्हटलंय. असे अनुभव तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतात, असंही त्याने म्हटलंय.

हृदयाशी संबंधित आजारांची फॅमिली हिस्ट्री

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, “गेल्या अडीच वर्षांपासून मी नॉनस्टॉप काम आणि चित्रपटांसाठी प्रवास करतोय. पण गेल्या काही महिन्यांपासून मला खूप थकल्यासारखं जाणवत होतं. सतत काम आणि प्रवासामुळे थकवा जाणवत असावा, असं मला वाटलं होतं. अर्थातच मी माझे मेडिकल टेस्ट वेळेवर करत होतो. ECG, 2D Echo, सोनोग्राफी, रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या. माझ्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यासाठी मी औषधं घेत होतो. माझ्या कुटुंबात हृदयाशी संबंधित आजाराचा इतिहास आहे. त्यामुळे मी काळजी घेत होतो.”

त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

ज्या दिवशी हार्ट अटॅक आला, तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी सांगताना तो पुढे म्हणाला, “आम्ही मुंबईत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. आर्मी ट्रेनिंगचा सीक्वेन्स होता आणि त्यामुळे पाण्यात पडणं, दोरीवरून उड्या मारणं असं सर्वकाही करत होतो. पण अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेताना खूप त्रास जाणवला. माझा डावा हात प्रचंड दुखू लागला होता. मी माझ्या व्हॅनिटी वॅनपर्यंत कसाबसा गेलो आणि कपडे बदलले. ॲक्शन सीन्सचं शूटिंग केल्याने असं काही होत असावं असं मला वाटलं होतं. कारमध्ये बसल्यानंतर मी थेट रुग्णालयात जाण्याचा विचार केला. पण नंतर वाटलं की नाही, आधी घरी जावं. माझ्या पत्नीने मला त्या स्थितीत पाहिलं आणि पुढच्या दहा मिनिटांत तिने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला रुग्णालयाचा गेट दिसत होता, पण एण्ट्रीजवळ बॅरिकेट लावल्याने यु-टर्न घ्यावा लागला. त्याच क्षणी माझा चेहरा सुन्न झाला आणि मी बेशुद्ध झालो. तो कार्डिॲक अरेस्ट होता. माझं हृदय काही मिनिटांसाठी धडधडणं बंद झालं होतं. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, त्यामुळे दिप्ती तिच्या कारमधून बाहेर पडू शकत नव्हती. त्यावेळी काही लोकांनी मदत केली आणि आम्हाला रुग्णालयात पोहोचवलं. डॉक्टरांनी मला तातडीने सीपीआर, इलेक्ट्रिक शॉक दिला.”

हे सुद्धा वाचा

श्रेयस तळपदे जीवदान

त्यादिवशी जणू जीवदान मिळाल्याचा अनुभव आल्याचं श्रेयसने सांगितलं. “क्लिनिकली, मी मृतावस्थेत होतो. कारण तेवढ्या तीव्रतेचा तो कार्डिॲक अरेस्ट होता. हा माझ्यासाठी वेक-अप कॉल होता असंच मी म्हणेन. आयुष्याने मला ही दुसरी संधी दिली आहे. माझं आयुष्य वाचविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचा मी किती ऋणी आहे हे मी शब्दांत मांडू शकत नाही. अर्थात माझी सुपरवुमन पत्नीसुद्धा, तिने मला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.