“माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत..”; ‘पुष्पा 2’मधील अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या श्रेयस तळपदेची खंत?

या चित्रपटाने भारतात अवघ्या चार दिवसात तब्बल 529.45 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. रविवारीही या चित्रपटाची जबरदस्त कमाई झाली. श्रेयस तळपदेनं पहिल्या आणि दुसऱ्या भागासाठी हिंदीत डबिंग केली आहे.

माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत..; 'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या श्रेयस तळपदेची खंत?
Shreyas Talpade and Allu ArjunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 2:05 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतोय. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा तब्बल 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाचं इतरही काही भाषांमध्ये डबिंग झालंय. त्यापैकी हिंदी भाषेत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पाराज’ या भूमिकेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागासाठीही श्रेयसनेच डबिंग केलं होतं. आता सीक्वेलला प्रेक्षकांकडून मिळणारा जबरदस्त प्रतिसाह पाहून त्याने आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्याचसोबत त्याने एक खंतसुद्धा बोलून दाखवली आहे.

‘डीएनए इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, “पुष्पा 2 हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून मला दररोज फोन आणि डीएम (डायरेक्ट मेसेज) येत आहेत. मी खूप खुश आहे आणि मला खरंच निर्मात्यांचे आभार मानायचे आहेत. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा एक भाग बनण्याची संधी मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मी भारावलोय.”

हे सुद्धा वाचा

श्रेयसने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बऱ्याच दमदार चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र ‘पुष्पा’मुळे जगभरात ओळख मिळाल्याचं त्याने मान्य केलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “मी माझ्या करिअरमध्ये इतके चित्रपट केले आहेत. इक्बाल, डोर, ओम शांती ओम, वेलकम टू सज्जनपूर, गोलमाल 3, हाऊसफुल 2.. पण तरीही या सगळ्यात पुष्पाच अग्रस्थानी आहे. त्यामुळे हा असा पहिला चित्रपट आहे ज्याने मला केवळ देशभरातच नाही तर जगभरात ओळख मिळवून दिली आहे. हिंदी भाषिक प्रेक्षकांना ठाऊक आहे की पुष्पा आणि पुष्पा 2 साठी मी डबिंग केली आहे. अशा चित्रपटानंतर जी लोकप्रियता किंवा ओळख मिळते, ते अभूतपूर्व आहे.”

यावेळी श्रेयसने अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी परफेक्ट डबिंग करण्यामागचं गुपितही सांगितलं. “मी जेव्हा त्या भूमिकेसाठी डबिंग करतो, तेव्हा मी स्वत:च ती भूमिका पडद्यावर साकारत असल्याची कल्पना करतो. मला माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत अशी भूमिका मिळाली नाही आणि भविष्यातही मला मिळेल की नाही हे माहीत नाही. पण जेव्हा मी पुष्पा राजसाठी डबिंग करतो, तेव्हा मी स्वत:च त्या भूमिकेत असल्याची कल्पना करतो. दमदार डॉयलॉगबाजीसह पॉवरफुल सीन्स करत असल्याची कल्पना करतो. यामुळेच पडद्यावर तो आवाज ऐकताना अधिक प्रभावी वाटतो”, असं श्रेयस म्हणाला.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.