श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत (Marathi TV) गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठे बदल पहायला मिळाले. मालिकांचा बजेट, प्रॉडक्शनवर होणारा खर्च, अभिनेत्यांना (Marathi Actors) मिळणारं मानधन या सर्वच गोष्टींच्या बाबतीत आता मराठी इंडस्ट्री बरीच विकसित झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे मोठमोठे कलाकारसुद्धा आता मालिका आणि छोट्या पडद्यावरील शोजकडे वळू लागले आहेत.
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत (Marathi TV) गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठे बदल पहायला मिळाले. मालिकांचा बजेट, प्रॉडक्शनवर होणारा खर्च, अभिनेत्यांना (Marathi Actors) मिळणारं मानधन या सर्वच गोष्टींच्या बाबतीत आता मराठी इंडस्ट्री बरीच विकसित झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे मोठमोठे कलाकारसुद्धा आता मालिका आणि छोट्या पडद्यावरील शोजकडे वळू लागले आहेत. स्वप्निल जोशी, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर यांसारखे लोकप्रिय चेहरे छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत. या कलाकारांना एका एपिसोडसाठी किती मानधन (Highest paid celebs) मिळतं, ते जाणून घेऊयात. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेनं ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन केलं. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील आपल्या दमदार अभिनयाने श्रेयसने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत श्रेयस आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार तो एका एपिसोडसाठी जवळपास 40 ते 45 हजार रुपये मानधन घेतो.
श्रेयसप्रमाणेच मराठी टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहता म्हणजे स्वप्निल जोशी. स्वप्निल सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी तो 60 ते 70 हजार रुपयांचं मानधन घेतो. अभिनेत्री मुक्ता बर्वे ही मराठी इंडस्ट्रीतील दमदार कलाकारांपैकी एक आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत तिने उमेश कामतसोबत काम केलं. मुक्ता आणि उमेश हे दोघंही टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी आहेत.
श्रेयसची पोस्ट-
View this post on Instagram
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं मराठी व्हर्जन ‘कोण होणार करोडपती’चं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. या शोच्या एका एपिसोडसाठी ते 50 लाख रुपयांचं मानधन घेत असल्याची माहिती आहे. सचिन खेडेकर हे गेल्या चार सिझन्सपासून या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच याचा पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
राजामौली.. सिर्फ नाम ही काफी है! रामचरण-ज्युनियर एनटीआरची ‘पॉवरपॅक्ड’ जुगलबंदी