Vidarbha Ratna : सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, श्रेयश जाधव ‘विदर्भ रत्न’ पुरस्काराने सन्मानित

सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयश जाधवला 'विदर्भ रत्न' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. (Shreyash Jadhav honored with 'Vidarbha Ratna' award)

Vidarbha Ratna : सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, श्रेयश जाधव 'विदर्भ रत्न' पुरस्काराने सन्मानित
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 2:53 PM

मुंबई : सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या किंग जे. डी. म्हणजेच श्रेयश जाधवला आर. पी. समर्थ स्मारक समितीच्या वतीनं देण्यात येणार्या ‘विदर्भ रत्न’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. आमदार आर. पी. समर्थ यांच्या 50 व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 30 जानेवारीला नागपूर येथे महापौर दयाशंकर तिवारी, विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजीत वंजारी आणि दळवी मेमोरिअल हॉस्पिटलचे अध्यक्ष बलबीरसिंग रेणू यांच्या उपस्थितीत झालं.

मराठी सिनेसृष्टीत रॅपचा पायंडा घालून देणाऱ्या श्रेयशनं ‘ऑनलाईन- बिनलाईन’, ‘बसस्टॉप’, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांची निर्मिती केली तर ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. श्रेयशनं चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण, आशयपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. आज अनेकदा मराठी सिनेसृष्टीत रॅप, हिप हॉप साँग्सचा प्रयोग केला जातो. मात्र मराठी इंडस्ट्रीला या वेस्टर्न म्युजिकची खरी ओळख श्रेयशनं करून दिली आहे. रॅप सॉंगमधूनही श्रेयशनं सामाजिक विषय अतिशय उत्तमरित्या हाताळले. म्हणूनच प्रेक्षकांनी कायमच त्याच्या कलाकृतीला पसंती दिली. प्रेक्षकांची नाळ ओळखून त्यांना दर्जेदार चित्रपट देणारा श्रेयश आता ‘मनाचे श्लोक’, ‘फकाट’, बघतोस काय मुजरा कर 2′, ‘मीटर डाऊन’ असा मनोरंजनाचा जबरदस्त खजिना घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विदर्भात जन्मलेल्या श्रेयशचा सिनेसृष्टीतील हा यशस्वी प्रवास निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. इतक्या कमी वयात त्यानं सिनेसृष्टीत भरपूर नाव कमावलं. त्याच्या याच कारकिर्दीची दखल घेत त्याला ‘विदर्भ रत्न’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!

Special Story | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात राहण्यासाठी तुमचे लाडके कलाकार घेतात ‘इतके’ मानधन!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.