Shruti Haasan: श्रुती हासनला मानसिक आरोग्याच्या समस्या? पोस्ट लिहित अभिनेत्रीने केलं स्पष्ट

मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळेच तिने नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली नाही, अशी चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता श्रुतीने उत्तर दिलं आहे.

Shruti Haasan: श्रुती हासनला मानसिक आरोग्याच्या समस्या? पोस्ट लिहित अभिनेत्रीने केलं स्पष्ट
Shruti HaasanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 8:33 AM

मुंबई: अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन ही मानसिक स्वास्थ्याबद्दल माध्यमांमध्ये मोकळेपणे बोलताना दिसले. मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळेच तिने नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली नाही, अशी चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता श्रुतीने उत्तर दिलं आहे. ‘वॉल्टेअर वीरैय्या’ या दाक्षिणात्य चित्रपटात श्रुती भूमिका साकारतेय. या चित्रपटाच्या प्री-रिलीजचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मात्र या कार्यक्रमाला श्रुती गैरहजर होती. वॉल्टेअर वीरैय्या या तेलुगू चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी यांची मुख्य भूमिका आहे. तर अभिनेता रवी तेजा यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे श्रुती या चित्रपटाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याच्या वृत्तांचे स्क्रीनशॉट तिने ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत लिहिलं, ‘चांगला प्रयत्न! आणि धन्यवाद.. मी व्हायरल तापातून बरी होत आहे.’

हे सुद्धा वाचा

आणखी एक भलीमोठी पोस्ट लिहित श्रुती मानसिक आरोग्याविषयीही व्यक्त झाली. ‘अशा पद्धतीची चुकीची माहिती पसरवणे, अशा विषयांना अत्यंत नाट्यमय पद्धतीने हाताळणे यांमुळेच लोक मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे बोलण्यास घाबरतात. पण या सर्वांचा काही उपयोग नाही. मी नेहमीच मानसिक आरोग्याविषयी बेधडकपणे बोलत राहीन. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेण्याला मी प्राधान्य देत राहीन. मला फक्त ताप होता, पण तुम्ही थेरेपीस्टकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे’, अशा शब्दांत तिने फटकारलं.

काही वेळानंतर श्रुतीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ती बेडवर आराम करताना दिसत आहे. ‘तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद आणि या ग्रँड लाँचला मी उपस्थित राहू शकले नाही याचं मला दु:ख आहे. सध्या मी लवकरात लवकर बरी होण्यावर भर देत आहे’, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

वॉल्टेअर वीरैय्या हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. श्रुतीचा आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तिने नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत भूमिका साकारली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.