ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अभिषेकला ‘ही’ महिला म्हणाली, ‘मी तुझ्यासोबत…’

Aishwarya Rai Bachchan : खरंच ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा होतोय घटस्फोट? 'ही' महिला अभिनेत्याला म्हणाली, 'आयुष्यात पुढे जा, मी तुझ्यासोबत...' सध्या सर्वत्र फत्त आणि फक्त ऐश्वर्या - अभिषेक यांच्या नात्याची चर्चा...

ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अभिषेकला 'ही' महिला म्हणाली, 'मी तुझ्यासोबत...'
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 11:48 AM

मुंबई| 13 डिसेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबात अनेक वाद सुरु आहेत… असा दावा करणारे देखील अनेक रिपोर्ट समोर आले. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला लेक श्वेता बच्चन हिच्या नावावर केलं. तर दुसरीकडे अभिषेक याने साखरपुड्याची अंगठी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय ऐश्वर्या राय हिच्या वाढदिवसासाठी देखील बच्चन कुटुंब सूनेसोबत नव्हतं… अशा अनेक कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणारी पोस्ट दुसरी तिसरी कोणाची नसून अभिषेक बच्चन याची बहिण श्वेता बच्चन हिची आहे. पोस्टमधील फोटो फार जुना असलेला वाटत आहे. फोटोमध्ये दोघे छान दिसत आहेत. पण श्वेता हिने लिहिलेल्या कमेंटवर अनेकांचं लक्ष येवून थांबलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

अभिषेक याच्यासोबत फोटो पोस्ट करत श्वेता म्हणाली, ‘सर्वकाही ठिक आहे… आयुष्यात पुढे जा… मी कायम तुझ्यासोबत राहिल…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिने पोस्ट केलेल्या फोटोची आणि लिहिलेल्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, बहिणीच्या पोस्ट कमेंट करत अभिषेक देखील ‘बेस्ट’ म्हणाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अनेक ठिकाणी ऐश्वर्या हिला लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. लग्नानंतर अनेक वर्ष चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे.

दरम्यान, ‘द अर्चिज’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी संपूर्ण बच्चन कुटुंबाला एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण यावेळी देखील अभिनेत्री जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा ऐश्वर्या हिला पाहून पाठ फिरवताना दिसल्या… असं देखील सांगण्यात आलं. स्क्रिनिंग दरम्यानचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.