‘लागिरं…’नंतर साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्वेता शिंदेची नवी मालिका

स्टार प्रवाहवर साता जल्माच्या गाठी ही मालिका 23 सप्टेंबर 2019 पासून सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहे.

'लागिरं...'नंतर साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्वेता शिंदेची नवी मालिका
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 1:05 PM

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लागिरं झालं जी’ मालिकेच्या यशानंतर निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘साता जल्माच्या गाठी’ (Saata Jalmachya Gaathi) ही मालिका पुढच्या आठवड्यापासून सुरु होत आहे.

श्रुती आणि युवराजची अनोखी लव्हस्टोरी ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. प्रेमासाठी कायपण करण्याची तयारी असणारे प्रेमवीर अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच असतात. युवराज त्यापैकीच एक. श्रुतीवर जीवापाड प्रेम करणारा आणि प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा असा युवराज आहे.

प्रेमाच्या आणाभाका देत सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या या दोघांच्याही प्रेमाची गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. बरीच अग्निदिव्य पार करत युवराज श्रुतीची हटके प्रेमकहाणी पूर्णत्वाला जाणार आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

‘साता जल्माच्या गाठी’ (Saata Jalmachya Gaathi) नावाप्रमाणेच मातीत रुळलेली लव्हस्टोरी आहे. मुख्य म्हणजे साताऱ्यात घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे साताऱ्यातच मालिका शूट होत आहे. मालिकेतले बरेचसे कलाकार साताऱ्यातले आहेत त्यामुळे एक वेगळी भट्टी जमून आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक वेगळी गोष्ट नक्कीच पाहायला मिळेल.’ असं या मालिकेविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले.

श्वेता शिंदेच्या ‘वज्र प्रॉडक्शन’ने या मालिकेची निर्मिती केली आहे. श्वेता मूळ साताऱ्याची असल्यामुळे तिचं साताऱ्यावर विशेष प्रेम आहे. मालिकेसाठी कलाकार आणि ठिकाणाची जुळवाजुळव सुरु असताना सातारा आणि आसपासच्या परिसरातील कलाकारांच्या निवडीवर भर देण्यात आला.

मालिकेत दिसणारा दिमाखदार बंगलाही साताऱ्याचाच आहे. स्टार प्रवाहसोबत श्वेताचे जुने बंध आहेत. लक्ष्य मालिकेतल्या भूमिकेसाठी श्वेताचं विशेष कौतुक झालं होतं. ‘साता जल्माच्या गाठी’च्या निमित्ताने ती निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर ही जोडी टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. सातारी भाषेचा लहेजा जपत या दोघांनीही मालिकेची गोडी वाढवली आहे. युवराज आणि श्रुतीची ही अनोखी प्रेमकहाणी 23 सप्टेंबर 2019 पासून सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

श्वेता शिंदेची निर्मिती असलेली ‘लागिरं झालं जी’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर तूफान लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अज्या आणि शितली यांच्या जोडीने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.