‘मुलगी २ नाही तर ५ लग्न करेल…’, अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नानंतर अनेकांनी साधला लेकीवर निशाणा

LOVE LIFE | अभिनेत्रीच्या आयुष्यात पुरुषाचं प्रेमच नव्हतं... एका मुलीची आई असताना अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न... लग्नाच्या काही वर्षांनंतर दुसऱ्या पतीवर केले गंभीर आरोप... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा... आज दोन मुलांचा करते 'सिंगल मदर' म्हणून सांभाळ

'मुलगी २ नाही तर ५ लग्न करेल...', अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नानंतर अनेकांनी साधला लेकीवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 11:49 AM

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून अभिनय विश्वात पाऊल ठेवलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. झगमगत्या विश्वात अभिनयाची संधी मिळाल्यानंतर अभिनेत्रींनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी लग्न केलं. त्यांपैकी काही अभिनेत्रींना पतीचं प्रेम मिळालं, तर काहींनी अनुभव… अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. अभिनेत्रीचं लग्न देखील झालं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्री घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय २००७ मध्ये अभिनेत्रीचं घटस्फोट झालं. त्यानंतर श्वेताने दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नात देखील अभिनेत्रीली अपयश आलं… ज्यामुळे अभिनेत्रीला अनेकदा ट्रोल करण्यात आलं. शिवाय अनेकांनी अभिनेत्रीच्या लेकीवर निशाणा साधला.

एका मुलाखातीत श्वेता तिवारी हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, ‘अनेक जण मला आता तिसरं लग्न करू नकोस आसा सल्ला देत आहेत. जर तुम्ही १० वर्ष लिव्हईन रिलेशनशिपमध्ये आहात आणि १० वर्षांनंतर तुम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. पण जर तुम्ही दोन वर्षात घटस्फोट घेतला तर अनेक चर्चा रंगतात. माझं आयुष्य आहे. तर निर्णय देखील माझाच असेल… ‘

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी दोन लग्न केली म्हणून माझी मुलगी पाच वेळा लग्न करेल असं अनेक जण म्हणाले… अशा लोकांना माझं उत्तर असेल, माझी मुलगी कधीही लग्न करणार नाही. तिच्या आईसोबत जे काही झालं ते तिने डोळ्याने पाहिलं आहे. त्यामुळे ती जोडीदाराचा विचार करताना खूप विचार करेल. तिने लग्न नाही केलं तरी माझी काहीही हरकत नाही…’ एक काळ असा होता जेव्हा श्वेता फक्त आणि फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती.

रिपोर्टनुसार, भोजपुरी अभिनेता राजा चौधरीसोबत श्वेता तिवारी हिचं पहिलं लग्न झालं होते. पण राजा चौधरी कायम नशेत असायचा. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने दावा केला की तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. श्वेता हिला पहिला पती दररोज मारहाण करायचा आणि शोच्या सेटवर तिच्याशी गैरवर्तनही करायचा. ज्यामुळे अभिनेत्रीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

पहिलं नातं अपयशी ठरल्यानंतर, श्वेता हिने दुसरं लग्न अभिनव कोहली याच्यासोबत केलं. दुसऱ्या पतीवर अभिनेत्री लेक पलक हिला त्रास देत असल्याचा आरोप केला. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी यांना एक मुलगा देखील आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.